पोलिस व रेल्वे प्रशासनाला निवेदन
गोंदिया : नागपूर येथील झिरो मैल सिताबर्डी येथे शहिद आदिवासी गोवारी समाज बांधवाच्या स्मृति प्रित्यर्थ आदिवासी गोवारी स्मारक तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी राज्यभरातून आदिवासी गोंड-गोवारी समाज बांधव दरवर्षी २३ नोव्हेंबर या दिवशी एकत्रित येवून श्रध्दांजली वाहत असतात. यंदाही श्रध्दांजली वाहण्यासाठी गोंदियातून हजारोच्या संख्येत आदिवासी गोंड-गोवारी समाज बांधव सहभागी होणार आहेत. यासाठी आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र गोंदिया शाखा अध्यक्ष सुशिल राऊत यांच्या नेतृत्वात पुर्वसुचना म्हणून रेल्वे प्रबंधक व शहर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
आदिवासी गोवारी समाज बांधवाकडून २३ नोव्हेंबर १९९४ ला आपल्या न्याय मागणीकरीता नागपूर हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यात मागण्या पूर्ण न होता ११४ गोवारी बंधू-भगिनी शहिद झाले. त्यांच्या स्मृति प्रित्यर्थ नागपूरच्या हृदयस्थळी झिरो मैल सिताबर्डी नागपूर येथे आदिवासी गोवारी स्मारक तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी ११४ शहिदाच्या स्मरणार्थ दरवर्षी २३ नोव्हेंबर रोजी जनसमुदाय उसळत असतो. यंदाही २३ नोव्हेंबर रोजी श्रध्दांजली कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोंदियातून हजारोच्या संख्येत आदिवासी गोंड-गोवारी समाज बांधव सहभागी होणार आहेत. याची पुर्वसूचना म्हणून आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र गोंदिया शाखा अध्यक्ष सुशिल राऊत यांच्या नेतृत्वात पुर्वसुचना म्हणून रेल्वे प्रबंधक व शहर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या माध्यमातून २३ नोव्हेंबर रोजी सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसने आदिवासी गोंड-गोवारी समाज बांधव रवाना होणार असून रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होवू, अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, शहर पोलिस निरीक्षक, तहसीलदार गोंदिया आदिंना देण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष सुशिल राऊत यांच्यासह आदिवासी गोंडगोवारी युवा बिग्रेड-अध्यक्ष प्रमोद शहारे, विजु भोयर, प्रविण चौधरी, निखिल ठाकरे, यांच्यासह समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.