गोंदिया : स्थानिक सूर्याटोला येथे गोवारी समाज संघटना सूर्याटोलाच्या वतीने शनिवार, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता 114 गोवारी शहिद बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आरक्षण हा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो आपण मिळविणारच, मानवी कृत्याला काळीमा फासणारी घटना 23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपुरातील विधानभवनाजवळ घडली. यात 114 निरपराध गोवारींचा नाहक बळी गेला. या घटनेला 30 वर्षे पूर्ण झाली. परंतु अजूनही आपण घटनादत्त अधिकारापासून वंचित आहोत. 23 नोव्हेंबर 1994 रोजी हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यात 114 लोकांना बलिदान द्यावे लागले. त्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्याकरिता आज, 23 नोव्हेंबर रोजी सूर्याटोला येथील आदिवासी चौकात सर्व गोवारी बांधव एकवटले होते. याप्रसंगी दोन मिनट मौन पाळून शहिद गोवारी बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष उमेश राऊत, उपाध्यक्ष संतोष नेवारे, सचिव सुखदेव शेंद्रे, सहसचिव राजेश राऊत, कोषाध्यक्ष बब्बाभाऊ राऊत, अशोक राऊत, प्रकाश नेवारे, शक्ती चामलाटे, शुभम चामलाटे, दुर्गेश चामलाटे, मुन्नालाल येल्ले, रोहित कावळे, आकाश आंबेडारे, केशरबाई चामलाटे, ताराबाई नेवारे, राजू येल्ले, बाबा पटले, छगनलाल गौतम, धनलाल गौतम, महेश नागोसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संतोष नेवारे यांनी केले तर आभार सुखदेव शेंद्रे यांनी मानले.