गोंदिया,दि.२५ः- जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी सालेकसा तालुक्यातील दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अतिदुर्गम नवाटोला या गावाला भेट देवुन कार्यक्षेत्रात किटकजन्य कार्यक्रमाची होत असलेल्या कामाची पाहणी केली.प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथील हिवताप दुषित रुग्णांचा आढावा घेवुन उपकेंद्र नवाटोला येथे भेट देवुन अतिदुर्गम नवाटोला या गावातील हिवताप दुषित रुग्णाची विचारपुस करुन दिल्या जात असलेल्या औषधोपचाराची माहिती जाणुन किटकजन्य कार्यक्रमाची पाहणी केली.गावात आशा सेविका व आरोग्य कर्मचार्यामार्फत ताप रुग्ण व कंटेनर शोध मोहिमेची माहीती जाणुन घेतली.
कीटकजन्य आजार बाबत सालेकसा तालुक्यातील दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस गिरी यांचेसह आरोग्य संस्थेत उत्तम सेवा देत असल्याबाबत आरोग्य कर्मचार्यांचे राबविण्यात येत असलेल्या कार्याचे समाधान व्यक्त करुन दररोज होत असलेल्या कामाचे पर्यवेक्षण चांगल्या प्रकाराचे करण्याच्या सुचना दिल्या.भेटी दरम्यान त्यांचे सोबत डॉ.पारस गिरी,आरोग्य पर्यवेक्षक ठाकरे,आरोग्य सहाय्यक किशोर भालेराव उपस्थित होते.
डॉ.विनोद चव्हाण यांनी भेटी दरम्यान आरोग्यवर्धिनी केंद्र दरेकसा येथील प्रयोगशाळेत सोबत किटकजन्य कार्यक्रमाचे आवश्यक रजिष्टर व रेकॉर्डची पडताळणी केली.तसेच आंतररुग्ण वार्ड,औषधीसाठा केंद्र ई.ची पाहणी केली.कार्यक्षेत्रातील गावे हे अतिदुर्गम व जंगलव्याप्त असल्याने हिवतापाबाबतची साथ उदभवु नये म्हणुन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे,कीटकजन्य,जलजन्य आजार तसेच साथीच्या रोगाबाबत उपाययोजना करणे, कार्यक्षेत्रातील 100 टक्के अंडवृद्धी शस्त्रक्रीया होण्याच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय येथे भरती करणे,आश्रमशाळा व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आर.डी.के.किट द्वारे रक्त तपासणी करणे,स्थलांरतीत लोकांचे यादी अद्यावत करुन पत्ता सिजन कामावरुन गावी परतलेल्या लोकांचे हिवतापाबाबत तपासणी करणे,हत्तीपाय रोग ग्रेड-3 वरील रुग्णांना अपगंत्व प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे नियोजन करणे,आरोग्य संस्थेत हिवताप बाबतचे रक्त नमुने बँकलॉग ठेवु नये,हिवतापाबाबत गप्पी मासे व लारवा यांचे शाळेत प्रात्यक्षिक जनजागृती कार्यक्रम घेणे ई.विविध बाबी सोबतच लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या द्रुष्टीकोनातुन सुधारणा करण्याच्या सुचना देण्यात आल्या.