भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ:- रचनाताई गहाणे

0
25

अर्जुनी मोर.-भारतीय संविधानाने देशाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक तथा व्यापारी दृष्टिकोनाने मजबूत बनविले आहे. संविधानाने आम्हा सर्व महिलांना समान न्याय हक्क व आमचे अधिकार मिळवून दिले. आज महिला प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचत आहेत हे सर्व संविधानामुळेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील तमाम शोषित पीडित बहुजन मागासवर्गीय समाजाला संविधानाचे माध्यमातुन एका धाग्यात आणले, महिला सक्षमीकरण स्वावलंबन व आत्मनिर्भर कशा होतील यासाठी ही संविधानात तरतूद केली आहे. आमच्या महिलांनी संविधानाचा अभ्यास करून कायद्याचे ज्ञान संपादन करून अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी तत्पर असावे. असे आवाहन करून भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असल्याचे प्रतिपादन नवेगाव बांध क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चा च्या महामंत्री रचनाताई गहाणे यांनी केले आहे.
सत्यमेव प्रभाग संघ नवेगाव बांध येथील कार्यालयात आयोजित तारीख 26 संविधान दिनाच्या कार्यक्रमात रचनाताई गहाणे विशेष अतिथी म्हणून बोलत होत्या, अध्यक्षस्थानी प्रभाग संघाच्या अध्यक्ष भीमाबाई शहारे ,शारदाताई डोंगरवार होत्या. अतिथी म्हणून चेतना डोंगरवार, शितल राऊत, प्रकाश मेश्राम, आचल शहारे, एम. सी. नागपुरे, प्रदीपा बडोले, उषा साखरे, सरोज नंदेश्वर, दीक्षा टेंभुर्णे,डाॅली जनबंधू, प्रणाली सांगोळकर, नीलम वालदे, शितल वालदे, वैशाली टेंभुर्णे तथा परिसरातील ग्रामसंघ व प्रभाग संघ तथा बचत गटाच्या महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या, सर्वप्रथम रचना गाहाने यांचे हस्ते महिला भगिनींच्या उपस्थीतीत भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध महिला पदाधिकारी व गटातील महिलांनी संविधानामुळे आपली प्रगती कशी होत आहे याबाबत आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला शेकडो महिला उपस्थित होत्या.