गोंदिया,दि.२८- लसीकरण हे बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी साधन आहे. सर्व आजारांवर लढण्यासाठी बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण दिल्यास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्यामुळे आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक गावात लसीकरण सत्राचे आयोजन करावे व कुठलाही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करावे.लोकांनी जबाबदारीने आपले बालकांचे संपुर्ण लसीकरण शासकिय रुग़्णालयात करुन आपल्या बालकास कुपोषण व गंभीर आजाराविरुद्ध लढण्यासाठी लागणारे प्रतिकार शक्ती निर्माण करावे.नागरिकांनी बालकास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावुन मोफत लसीकरण करुन घ्यावे.तसेच बाळाला जन्मतः स्तनपान व बिसीजी,पोलिओ,हिपॅटायटीस-बी,व् हिटँमिन-के चे पंचःसुत्री लसीकरण देवुन कवच कुंडले प्रदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी या प्रसंगी केले.
नियमित लसीकरण बाबतची जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
जिल्ह्यातील नियमित लसीकरण बाबतचे सादरीकरण जागतिक आरोग्य संघटना नागपुर विभागाचे राज्य सर्वेक्षण वैद्यकिय अधिकारी डॉ.साजिद यांनी सादरीकरण केले.
डॉ.साजिद यांनी प्रसूती झाल्यानंतर 24 तासाच्या आत बाळाला हिपॅटायटीस-बी लसीकरण देणे आवश्यक असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य संस्थेमध्ये प्रसुती झाल्यानंतर बाळाला हे लसीकरण देण्यात येत असुन खाजगी नर्सिंग रुग्णालयात प्रसूती झाल्यावर बालकास हिपॅटायटीस-बी लसीकरण सुद्धा अवश्य करुन घेण्याचे सांगितले.
जिल्ह्यात सर्व शासकिय आरोग्य संस्थेत बीसीजी,हिपॅटायटीस-बी,पोलिओ, पेंटाव्हँलंट, रोटा व्हायरस, पीसीव्ही,आयपीव्ही,गोवर-रुबेला, जेई,डिपीटी,व्हिटँमिन-अ डोज ई.विविध लसीकरण मोफत दिले जात आहे.जिल्ह्यात नियमित लसीकरण अंतर्गत गावनिहाय लसीकरण सत्रे आयोजित करुन बालकांना लसिकरण करण्यात येत आहे.जागृत राहुन पालकांनी आपल्या बालकास वयोगटातील सर्व लसीकरण करुन बालकाच्या शरीरात विविध आजाराविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकार शक्ती निर्माण करावी तसेच कुपोषण व बालमृत्यु रोखण्यासाठी नियमित लसीकरण वेळेत करण्याचे सांगितले.
जिल्हास्तरीय समिती सभेला जागतिक आरोग्य संघटना नागपुर विभागाचे सर्वेक्षण वैद्यकिय अधिकारी डॉ.साजिद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिष मोहबे ,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.बी.जयस्वाल,वैद्यकिय अधिकारी डॉ.सलील पाटील,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे,जिल्हा आय.ई.सी अधिकारी प्रशांत खरात,तसेच डॉ.दर्शना नंदागवळी,डॉ. प्रणित पाटील,डॉ. भुमेश्वर पटले,डॉ.सुरेंद्र खोब्रागडे,डॉ.स्वप्निल आत्राम ,डॉ.ललित कुकडे,डॉ.विनोद चव्हाण,डॉ. अमर खोब्रागडे ई.तालुका आरोग्य अधिकारी,डॉ.पुरुषोत्तम पटले,डॉ.राहुल शेंडे,डॉ.प्रशांत तुरकर,डॉ.दिपक आगलावे,डॉ.नंदा गेडाम,डॉ.संजय माहुले,ई.ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक,शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे डॉ.मरस्कोल्हे,बालरोग तज्ञ डॉ.सचिन उईके,डॉ.ललित मेश्राम,डॉ.अनिल आटे,डॉ.निलिमा नरडेले तसेच शासकीय कार्यालयाचे व अशासकिय संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील नियमित लसीकरण बाबतचे सादरीकरण जागतिक आरोग्य संघटना नागपुर विभागाचे राज्य सर्वेक्षण वैद्यकिय अधिकारी डॉ.साजिद यांनी सादरीकरण केले.
डॉ.साजिद यांनी प्रसूती झाल्यानंतर 24 तासाच्या आत बाळाला हिपॅटायटीस-बी लसीकरण देणे आवश्यक असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य संस्थेमध्ये प्रसुती झाल्यानंतर बाळाला हे लसीकरण देण्यात येत असुन खाजगी नर्सिंग रुग्णालयात प्रसूती झाल्यावर बालकास हिपॅटायटीस-बी लसीकरण सुद्धा अवश्य करुन घेण्याचे सांगितले.
जिल्ह्यात सर्व शासकिय आरोग्य संस्थेत बीसीजी,हिपॅटायटीस-बी,पोलिओ, पेंटाव्हँलंट, रोटा व्हायरस, पीसीव्ही,आयपीव्ही,गोवर-रुबेला,