हलबीटोला येथे बाल हक्क व दत्तक सप्ताह मार्गदर्शन कार्यक्रम

0
28

गोंदिया दि.28 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालया अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष गोंदिया यांच्या मार्फत महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली 21 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हलबीटोला, ता.गोंदिया येथे बाल हक्क व दत्तक सप्ताह च्या निमित्याने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

सदर कार्यक्रमामध्ये दत्तक विधान प्रक्रिया, बालकांचे अधिकार, लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2012 (POCSO) सुरक्षित व असुरक्षित स्पर्श या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या मनिषा चौधरी यांनी मार्गदर्शन केले. अनाथ प्रमाणपत्र, बाल विवाह या विषयावर भागवत सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. चाईल्ड हेल्प लाईन व 1098 याविषयी प्रकल्प समन्वयक विशाल मेश्राम यांनी माहिती दिली. याशिवाय केस वर्कर राजेश खोब्रागडे यांनी 1098 याचा वापर कधी व कसा करायचा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हलबीटोला चे प्राचार्य श्री. कोरे, तसेच शाळेतील इतर शिक्षक व कार्यालय कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे  आभार श्री. अंबादे यांनी मानले.