भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे-कॉम्रेड हिवराज उके

0
8
 भंडारा -: भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार कोणताही देश धर्मनिरपेक्षते शिवाय आधुनिक देश होऊ शकणार नाही. तसाच सबंध भारतीय समाज आधुनिक व्हायच्या असेल तर धर्मनिरपेक्षता ही एक जीवन प्रणाली म्हणून मान्य करणे आवश्यक आहे. तसेच आम्ही भारतीयांनी एक सार्वभौम समाजवादी लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्प पूर्वक निर्धार केला. परंतु हा संकल्प अजूनही पूर्णत्वास आलेला नाही. तो पूर्ण करण्यासाठी संविधान प्रेमींची एकजूट व त्यासाठी संघर्ष ही काळाची गरज आहे असे विधान भाकपचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सहसचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी केले आहे.
       दिनांक 26 नोव्हेंबर 2024 ला सकाळी 11 वाजता भाकप कार्यालय राणा भवन भंडारा येथे संविधान दिनाचा 75 वा वर्धापन दिन समारंभ ज्येष्ठ कम्युनिस्ट पुढारी कॉम्रेड सदानंद इलमे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी कॉम्रेड हिवराज उके बोलत होते.
              याप्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड सदानंद इलमे म्हणाले की, 75 वर्षानंतर आता तरी केंद्र व राज्य शासनाने भारतीय संविधानाची अंमलबजावणी करावी आणि देशातील गरिबी, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, अन्याय-अत्याचार, लिंगभेद धर्मांधता, खाजगीकरण, शोषण व विषमता नष्ट करून धर्मनिरपेक्ष-समाजवादी भारत सरकार करावे.
संचालन तालुका सचिव कॉम्रेड गजानन पाचे यांनी केले तर आभार कॉम्रेड दीपक गजभिये यांनी  मानले.
    कार्यक्रमाला प्रामुख्याने मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड माणिकराव कुकडकर, वामनराव चांदेवार, शितल नागदेवे, सैजादी शेख, देवकाबाई जांगडे, लिलाबाई तुळसकर, गौतम भोयर, सुशील खांडेकर,अंबुले काका, भगवान मेश्राम, सौरभ नागोसे, गणेश क्षीरसागर इत्यादींची उपस्थिती होती.