आमदार राजकुमार बडोले यांनी मृतांच्याप्रती शोकसंवेदना केल्या व्यक्त

0
774

= मदत आणी बचाव कार्यासाठी प्रशासनाला दिले आदेश =
( मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांना त्वरीत मदत करण्याचे केले भावनिक आवाहन )
अर्जुनी मोर.दि.२९ः–अर्जुनी मोर.विधानसभा अंतर्गत सडक/ अर्जुनी तालुक्यातील कोहमारा — गोंदिया मार्गावरील खजरी डव्वा गावाजवळ आज ता.29 नोव्हेंबर ला झालेल्या एस.टी आगाराच्या शिवशाही बसला झालेल्या भिषण अपघातात 10 ते 15 प्रवासी मृत्युमुखी पडल्याची भिती व्यक्त करण्यात आली असुन अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.या भिषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वाप्रती या विभागाचे आमदार राजकुमार बडोले यांनी शोक संवेदना प्रकट करुन तातडीने मदत बचाव कार्यासाठी जिल्हाधिकारी तथा संपुर्ण प्रशासनाला सुचना केल्या.तसेच सर्व मृतांना व जखमींना शासनातर्फे त्वरीत मदत मिळावी म्हणुन काळजीवाहु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांना त्वरीत घटनेची माहीती देवुन भरीव मदत देण्याची विनंती केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भंडारा आगाराची शिवशाही बस क्रमांक एम. एच. 09 इ .एम. 1273 ही भंडाऱ्यावरून लाखनी, साकोली, कोहमारा मार्गे गोंदियाला निघाली. कोहमारा– गोंदिया मार्गावर डव्वा खजरीच्या मध्यभागी दुपारी एक च्या दरम्यान एका दुचाकी ला वाचवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली या भीषण अपघातात दहा ते बारा जण मृत्यू झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर दहा ते पंधरा जण जखमी झाले असून काही प्रवासी गंभीर जखमी आहेत. ही घटना अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या डव्वा खजरी जवळ घडली असून यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व प्रवाशांप्रति आमदार राजकुमार बडोले यांनी शोक संवेदना प्रकट करून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य शासनाला त्यांनी त्वरित भ्रमणध्वनी द्वारे कळवून तसेच गोंदिया जिल्हा प्रशासनाला तातडीने शोध व बचाव कार्यासाठी सूचना केल्या.