प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

0
205

अर्जुनी मोरगाव–स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालया चे प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले यांना महात्मा फुले शिक्षण संस्था, नागपूर यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार, ऍड. ज्वाला धोटे, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संयोजक डॉ. अभिजित पोतले, सह संयोजक प्रा. पंकज कुरळकर, सरचिटणीस रवींद्र अंबाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याचवर्षी सप्टेंबर 2024 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रलर अमेरिका यांच्या वतीने डॉ ईश्वर मोहुर्ले यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने गौरविण्यात आले. सोबतच बंगलोर येथील इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर्स च्या वतीने उत्कृष्ट प्राचार्य या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्या यशाबद्दल श्री दुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लुनकरण चितलांगे, उपाध्यक्ष बद्रीप्रसाद जायस्वाल, सचिव मुकेश जायस्वाल तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.