गडचिरोली,दि.02:१ डिसेंबर २०२४ जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून या वर्षीचे घोषवाक्य “मार्ग हक्काचा सन्मानाचा" या आधारावर जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाविद्यालय यांच्या सहकार्याने जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी सर्वप्रथम जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक याच्या अध्यक्षतेखाली 2 डिसेंबर जागतिक एड्स दिन कार्यक्रम संपन्न झाला. तसेच नोडल ऑफिसर ART सामान्य रुग्णालय, गडचिरोली डॉ नागदेवते यांनी एडस् विरोधी शपथेचे वाचन केले. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत आखाडे. डॉ. दुर्वे, डॉ. साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महेश भांडेकर, CSO डॉ. अभिषेक गव्हारे, जिल्हा महिला व बाल सामान्य रुग्णालय अधीसेविका, एआरटी, ICTC व विहान प्रकल्पाचे कर्मचारी यांची उपस्थीती होती.
एडस् विरोधी शपथ घेऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.रॅली ही जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली मार्गे बाजारातून घालुन परत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे समाप्त करण्यात आली. रॅली मध्ये महाविद्यालयीन व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीनी रॅली दरम्यान एचआयव्ही/एड्स संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध घोषवाक्य म्हणून व माहिती पत्रक वाटप करून जनजागृती करण्यात आली. तसेच नर्सिंग कॉलेज जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांच्या मार्फतीने पथनाटय सादर करण्यात आले व बस स्थानक येथे जनजागृती करण्यात आली. रॅलीच्या सुरुवाती पूर्व कार्यक्रमात सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी "मार्ग हक्काचा सन्मानाचा" या आधारावर जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधीत रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधा तसेच शासनाच्या योजना याविषयी माहिती देऊन एड्स प्रतिबंध करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणेने कार्य करावे, यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन आयसीटीसी समुपदेषक राजेश गोंडाणे यांनी तर पाहुण्यांचे आभार अधीसेविका रामटेके यांनी मानले.