अर्जुनी मोर. येथे शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

0
105

अर्जुनी मोर.-सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जनसेवेचे महान कार्य म्हणून शंभर दिवशीय टीबी मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर. येथे 7 डिसेंबरला करण्यात आला.
सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद गोंदिया व तालुका आरोग्य विभाग अर्जुनी मोरगाव यांचे संयुक्त विद्यमाने 7 डिसेंबर ते 24 मार्च 2025 पर्यंत शंभर दिवसीय टीबी मुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूरचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, डॉ. कापसे, डॉ. राऊत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गेडाम मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुकन्या कांबळे व आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत अभियानाची माहिती देताना या मोहिमेत निक्षय शिबिराद्वारे समाजातील अति जोखमीच्या लोकसंख्येची तपासणी करण्यात येत येणार असून त्यामध्ये दोन आठवडे पेक्षा जास्त दिवसाचा खोकला, कमी वजन होणे ,छातीत दुखणे, संध्याकाळी येणारा हलका ताप, थुंकी वाटे रक्त पडणे, पूर्वी क्षयरोग झालेले क्षयरोग बाधित रुग्णांचा सहवासातील एचआयव्ही बाधित रुग्ण, कुपोषित व्यक्ती, साठ वर्षावरील व्यक्ती, मधुमेह बाधित धूम्रपान करणारे व्यक्ती यांची क्षयरोग बाबतची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी अंति निदान झालेल्या क्षय रुग्णास मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे. भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी धोरणानुसार सन 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत टीबीवर मात करण्यासाठी 100 दिवसीय टीबी मुक्त अभियानाचे माध्यमातून समाजातून टीबी हद्दपार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे या कार्यक्रमात सांगण्यात आले. या उपक्रमात अर्जुनी मोरगाव तालुक्यातून टीबी मुक्त लक्षण जाणवल्यास या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुकन्या कांबळे तर संचालन वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक कु. राजवाडा शेख यांनी केले या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी आशा सेविका, गटप्रवर्तक व अन्य नागरिक उपस्थित होते.