गोंदिया : न्यु युवा सांस्कृतिक मंडळ खैरी यांच्या सौजन्याने लोकग्रहास्तव मंडईनिमित्त खैरी (पिंपळगाव/स.) येथे १० डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता प्रसिध्द सप्तखंजेरी वादक समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे जाहिर किर्तन आयोजित करण्यात आले आहे. तर पंचरंगी गणेश दंडार मंडळ मर्हेगाव/न.यांचा दंडारीचा कार्यक्रम दुपारी १ वाजता आयोजित आहे. सदर कार्यक्रम ग्राम पंचायत समोरील भव्य पटांगणावर आयोजित आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आ.नाना पटोले यांच्या हस्ते डॉ.खा.प्रशांत पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी अतिथी म्हणून लाखनीचे तहसीलदार धनंजय देशमुख, पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव, मो.मतीन इशाख शेख, माजी आमदार बाळाभाऊ काशिवार, सेवक वाघाये, सोमदत्त करंजेकर, जि.प.सदस्या डॉ.मनिषा निंबार्ते, किशोर मडावी, आकाश कोरे, श्रावण कापगते, पंकज शामकुंवर, सरपंच शाम शिवणकर, मनोहर बोरकर, शालिनी गजभिये, मुकेश मेनपाले, लता रामटेके, मनोरमा हुमणे, बाळा शिवणकर, केवराम वाडीभस्मे, रविंद्र मसराम, ललिता कोरे, नुतन झिंगरे, सी.जी.भानारकर, प्रफुल चौधरी, ग्राम पंचायत सदस्य प्रशांत मेश्राम आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन संतोष निर्वाण, पवन मेश्राम, बसुराज गभणे, स्वप्नील फाये, आदित्य मेश्राम, निकेश निर्वाण, लौकिक रोकडे, रमन निर्वाण, सुबोध वाडीभस्मे, भुपेश झिंगरे, पवन रोकडे, विपुल मेश्राम आदिंनी केले आहे.