गोंदिया,दि.12 डिसेंबर– सिकलसेल आजारा विषयी लोकांमध्ये जनजाग्रुती होण्याच्या दृष्टिने जिल्ह्यात जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह दि.11 ते 17 डिसेंबर 2024 दरम्यान राबविण्यात येत आहे.जिल्हा स्तरावर दि.11 डिसेंबर रोजी के.टी.एस. सामान्य रुग्णालय गोंदिया येथे जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यावेळी उपस्थित होते. सर्वात प्रथम मान्यवरांच्या हस्ते आरोग्याची देवता धन्वंतरी मातेचे पुजन करण्यात आले.
सिकलसेल हा आनुवंशिक आजार आहे. या आजाराचे संपूर्ण उपचार नाही पण नियंत्रण मात्र शक्य आहे. सिकलसेल रुग्णास नियमित समतोल आहार आवश्यक असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यात यावी. तरी जिल्ह्यातील नवयुवकांनी आवर्जून पुढे येऊन सिकलसेल बाबत सोल्युबिलिटी तपासणी करावी असे आवाहन डॉ.अमरिश मोहबे यांनी केले.सिकलसेल आजार अनुवांशिक आहे पण संसर्गजन्य नसल्याचे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी याप्रसंगी केले.सामान्य लाल रक्त पेशी या गोलाकार व लवचिक असतात तर सिकलसेल लाल रक्त पेशी ह्या विळाच्या आकाराच्या असतात.तसेच त्या कडक असतात.सिकलसेल रुग्णांना अशक्तपणा, सांधेदुखी,सांधे सुजणे,डोळे पिवळसर होणे,असह्य वेदना होणे,लहान बालकांना वारंवार जंतुसंसर्ग होणे असे विविध लक्षणे आढ्ळुन येत असतात.
लग्न ठरविण्यापूर्वी मुलगा व मुलगी दोघांची रक्ताची तपासणी करून घेण्याचे आवाहन ह्याप्रसंसंगी करण्यात आले.लोकांनी जागरुकपणे असे विवाह टाळले पाहीजे ज्यात दोघेही वाहक असतील,एक वाहक व एक ग्रस्त असेल तर तसेच दोघेही ग्रस्त असतील तर कारण त्यामुळे आपल्या परिवारात होणाऱ्या अपत्याला सिकलसेल हा आजार होऊ शकतो.
कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सिकलसेल आजाराबाबतचे जनजागृती पोस्टरचे विमोचन करण्यात आले.उद्घाटन कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे डॉ.गुरुप्रकाश खोब्रागडे,डॉ.पवन राऊत,डॉ.भारती जयस्वाल,डॉ.सचिन उईके,डॉ.अजय घोरमारे,डॉ.अनिल आटे,डॉ.मिना वट्टी,डॉ.स्वर्णा उपाध्याय, डॉ.स्नेहा वंजारी,डॉ.पंकज पटले,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे,जिल्हा आय.इ.सी.अधिकारी प्रशांत खरात,सिकलसेल समन्वयक स्वपना खडाईत यांचे सोबत सिकलसेल कार्यक्रमाचे निशा डहाके,निता फुले,सुरेंद्र पारधी,योगेश नैताम सह राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाचे समन्वयक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अनिल आटे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वपना खडाईत यांनी केले.