बुलढाणा-चिखली शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घालत ३० नागरिकांना चावा घेऊन जखमी केले. यामुळे शहरभर दहशत पसरली आहे.जखमींपैकी नऊ जणांवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित चिखलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. आठवडी बाजार, तहसील कार्यालय परिसर आणि राऊतवाडी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. जखमींमध्ये चार बालकांचा समावेश आहे.चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकरी प्रशांत बिडगर यांनी तयार केलेली टीम कुत्र्याचा विविध भागात शोध घेत आहे.
जखमींची नावे
संघर्ष इंगळे, रुपाली वाघमारे, शेख शाहरुख, अलीम खान चांद खान, पंढरी सपकाळ, अंश गवळी, गजानन कस्तुरे (सवणा), अनंता सुरडकर (शिंदी हराळी), भिकाजी शिंदे, अश्विनी सगट, चंद्रकांत राऊत (बुलढाणा), प्रगती निकाळजे, शेख शाहिद, अजीम शेख यासीन पटेल (खामगाव), राहुल गवई (गिरोला), शेख मुज्जमिर, गजानन पवार, शेख अख्तर (पेठ), अस्लम इब्राहिम खान (शेलुद), शेख मुज्जमिर शेख कलीम, सुकेशनी समाधान नरवाडे.