नवनिर्वाचित आमदार ईंजी.राजकुमार यांचे सडक/ अर्जुनी येथे जंगी स्वागत

0
263

= आमदार बडोले यांनी मानले पदाधिका-यांचे आभार
सडक अर्जुनी,दि.१३ः-६३ अर्जुनी मोरगाव विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांचे निवडणुक निकालानंतर दि.11 डिसेंबर ला सडक/ अर्जुनी येथे आगमन होताच महायुतीतील सर्व मित्रपक्षाचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.तर आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांनी सर्व पदाधिका-यांचे मनापासुन आभार मानले.
अर्जुनी मोरगाव विधानसभेची निवडणुक नुकतीच पार पडली.23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाले.महायुतीला अपेक्षेपेक्षा अधिकच्या जागा मिळाल्या.त्याच बरोबर महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नवनिर्वाचीत आमदारांना तातडीने मुंबईला बोलाविण्यात आले.सर्वप्रथम मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री,व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा महाशपथविधी सोहळा पार पडला.त्यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला.या सर्व व्यस्थतेमुळे अखेर वेळ काढुन आमदार राजकुमार बडोले यांचे 11 डिसेंबर ला सडक/ अर्जुनी ला आगमन झाले.महायुतीच्या पदाधिका-यांनी फटाक्याच्या आतिषबाजीत नवनिर्वाचित आमदार राजकुमार बडोले यांचे जंगी स्वागत केले. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहुन आमदार बडोले अत्यंत भावुक झाले.सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे त्यांनी मनापासुन आभार मानले.तथा मी आपल्या विश्वासाला तडा जावु देणार नाही.असी ग्वाही आमदार बडोले यांनी दिली.यावेळी भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गट, शिवसेना शिंदे गट, पिरिपा व अन्य मित्रपक्षाचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येनी उपस्थीत होते.