धान खरेदी शेतकरी नोंदणीस 31 डिसेंबरपर्यत मुदतवाढ

0
891

भंडारा, दि.13 :-आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम 2024-25 करिता धान खरेदी करीता ऑनलाईन शेतकरी नोंदणी दि. 15/12/2024 अखेर मुदत देण्यात आली होती. सदर योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना होण्यासाठी आणि जिल्ह्यातील उर्वरीत शेतकऱ्यांची धान खरेदी करिता ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शासनाचे दि.13 डिसेंबर 2024 च्या पत्रानुसार शेतकरी नोंदणीची मुदत वाढविण्यात आली असून ती दि.31/12/2024 करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील मंजुरी मिळालेल्या सर्व धान खरेदी केंद्रांनी दि.31/12/2024 अखेर ऑनलाईन शेतकरी नोंदणीचे कामकाज पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांनी केले आहे.