पुर्व विदर्भातील ४ जिल्ह्यांना भोपळा,पण विदर्भातून सात जणांना मंत्रिपद

0
687

नागपूर,दि.१५- : विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यावर विदर्भाची राजधानी व राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) आणि आशीष जयस्वाल (शिवसेना-शिंदे) या तिघांचा तर विदर्भाचा विचार केला तर एकूण सात जणांचा समावेश आहे.मात्र यावेळीही गोंदिया,भंडारा जिल्ह्याला मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले.तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यानाही संधी नाकारण्यात आली आहे.

सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात फडणवीस मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. त्यात एकूण ३९ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यात विदर्भातील सात जणांचा समावेश आहे. चार भाजपचे, दोन शिंदे गटाचे तर एक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश आहे.नागपूर जिल्ह्यातून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), पंकज भोयर (वर्धा), अशोक उईके (राळेगाव) आणि आकाश फुंडकर (खामगाव) या चौघांचा भाजपकडून शपथविधी झाला. शिवसेनेकडून आशीष जयस्वाल (रामटेक), संजय राठोड (पुसद) तर राष्ट्रवादी (अजित पवार)कडून इंद्रनील नाईक (पुसद) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.