बालकांचे नियमित लसीकरण करा जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते

0
19

भंडारा,दि.16 : नियमित लसिकरणासाठी गठित टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.मनीषा साकडे यांनी जिल्ह्यात चालू असलेल्या नियमित लसीकरणाचे सादरीकरण केले.

           जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय सर्वेक्षण अधिकारी डॉ. मोहम्मद साजिद यांनी आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाऱ्या लसीकरणाच्या सेवेचा सर्वेक्षण अहवाल मांडला. यावर जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. बाल मृत्यू दर आणि कुपोषण थांबवण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी माध्यम आहे. जन्मापासून सर्व आजाराशी लढणायसाठी प्रतिकारक्षमता बाळाच्या शरीरात निर्माण होते. त्यामुळे आरोग्य विभाग जिल्ह्यातील प्रत्येक गावात लसीकरण सत्र आयोजित करून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेते. पालकांनी आपल्या बाळाला कुपोषण आणि आजारापासून वाचवण्यासाठी बालकांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

          शासकीय दवाखान्यात लसीकरण करावे. जिल्हाधिकारी  डॉ.संजय कोलते यांनी नागरिकांना आव्हान केले कि, जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावर जाऊन मोफत लसीकरणाचा सर्वानी लाभ घ्यावा व बाळाला जन्मतः स्तनपान व बीसीजी,पोलियो,हिपॅटायटिस-बी, व्हिटॅमिन के हे पाच लस देऊन बाळाचे आजारापासून संरक्षण करावे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद सोमकुंवर म्हणाले कि, प्रसूतीनंतर पहिल्या 24 तासाच्या आत बाळाला हिपॅटायटिस-बी ची लस देणे आवश्यक आहे.

           जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात प्रसूती नंतर बाळाला हि लस मोफत दिली जाते. तसेच खाजगी रुग्णालयांनी सुद्धा प्रसूती नंतर बाळाला हिपॅटायटिस-बी ची लस देऊन राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात आरोग्य विभागाला मदत करण्याचे आव्हान केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण  संजय जिल्हे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. कुंभरे, शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे, डॉ.अशोक ब्राह्मणकर IPA, डॉ.यशवंत लांजेवार प्रेसिडेंट IMA, डॉ. दुर्गेश पसीने IMA, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, तालुका वैद्यकीय अधिकारी, व कर्मचारी यांची उपस्थिती होते.