लोक अदालतीत ९४३८ प्रकरणांचा निपटारा; ६ कोटी ८६ लाखाची वसुली

0
48

गोंदिया :- वर्षानुवर्षापासून न्याय प्रविष्ठ असलेल्या खटले समोपचार व सामंजस्याने त्वरित निकाली लावण्यासाठी १४ डिसेंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालयच्या (District Court) वतीने लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत ७७ दिवाणी, १०३४ फौजदारी व ८३२७ पुर्व न्याय प्रविष्ठ असे एकूण ९ हजार ४३८ प्रकरणे निकाली काढण्यात आले. दिलेल्या निर्वाळ्यातून ६ कोटी ८६ लाख १३ हजार ७४९ रुपयाची वसुली करण्यात आली. त्याच प्रमाणे स्पेशन ड्राईव्ह अंतर्गत जिल्हा न्यायालयामधील ३९३ प्रकरणे निकाली काढण्यात आले.

राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) व उच्च न्यायालयच्या निर्देशान्वये गोंदिया येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश ए.टी. वानखेडे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के.वाळके यांच्या प्रमुख मार्गदर्शनात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये न्यायप्रविष्ठ प्रकरणे पटलावर मांडण्यात आले. जिल्ह्यातील एकूण प्रलंबित १६६४ दिवाणी प्रकरणा पैकी ७७ प्रकरणे निकाली काढण्यात आले. या प्रकरणातून ३ कोटी ६० लाख ८६ हजार ५०७ रुपयाची वसुली करण्यात आली. ३३३९ प्रलंबित फौजदारी प्रकरणापैकी १०३४ प्रकरणे निकाली काढण्यात आले असून १ कोटी ३४ लाख ५९ हजार ३५४ रुपयाची वसुली करण्यात आली तसेच जिल्ह्याभरात एकूण न्यायप्रविष्ठ ३१ हजार ५२० प्रकरणापैकी ८ हजार ३२७ प्रकरणे निकाली काढण्यात आले. या प्रकरणातून १ कोटी ९० लाख ६७ हजार ८८८ रुपयाची वसुली करण्यात आली. लोक अदालतीत एकुण ३६ हजार ५०३ प्रकरणे पटलावर ठेवण्यात आले होते. त्यापैकी ९ हजार ४३८ प्रकरणे समोपचार व सामंजस्यातून निकाली काढण्यात आली. तसेच एकूण ६ कोटी ८६ लाख १३ हजार ७४९ रुपयाची वसुली करण्यात आली.

लोक अदालतीमध्ये(Lok Adalat) न्यायमूर्ती ए.एस. प्रतिनिधी, न्यायमूर्ती एम.जे.मोहड, न्यायमूर्ती एम.बी.कुडते. न्यायमूर्ती श्रीमती वाय.के. राव, न्यायमूर्ती एस.आर. मोकाशी, न्या. वाय. जे. तांबोळी, न्या. डॉ. एस. व्ही. आव्हाड तसेच वकिल संघ व पॅनलवरील वकिल अ‍ॅड. एम.पी. चर्तुवैदी, अ‍ॅड. एच.एस. पतेह, अ‍ॅड. पी.एन.डोंगरे, अ‍ॅड. ए.जे. उके, अ‍ॅड. ए.व्ही. दुबे यांनी विशेष कामगिरी पार पाडली. लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी वा.ह. रहिले, पी.डी. अनकर, पी.एन. गजभिये, सुशिल गेडाम, के.एस. चौरे, एल.ए. दर्वे, कु. प्रिती जेंगठे, बी.डब्लु. पारधी, रोहित मेंढे, रायभान मेश्राम तसेच न्यायालयीन कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.