जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न
गोरेगाव : तिर्थक्षेत्र पोंगेझरा पुरगाव (हि.) येथे तिर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत ८० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले. एकूण मंजूर ८० लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता बांधकाम ३० लक्ष रुपये, भक्त प्रतिक्षालय बांधकाम २० लक्ष रुपये, सौंदर्यीकरण १० लक्ष रुपये, पेवींग ब्लॉक लावणे १० लक्ष रुपये आणि रेलिंग बांधकाम १० लक्ष रुपये अशा कामांचा समावेश आहे. दरम्यान पंकज रहांगडाले यांनी महादेव मंदिरात विधीवत पूजा अर्चना करुन समाजाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली.
भूमीपूजन कार्यक्रमवेळी प्रामुख्याने चित्रकलाताई चौधरी प. स.सदस्य,पुष्पराज जनबंधू माजी प. स.सदस्य,अनंता ठाकरे तसेच मोठ्या संख्येने भोलेनाथ भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.