वितरण प्रणालीचा केरोसीन चोरताना रंगेहात पकडले

0
15

– अर्जुनी-मोर तहसीदारांची कारवाई
– पोलिसात गुन्हा दाखल

अर्जुनी-मोर,दि.19-सार्वजनीक वितरण प्रणाली अंतर्गत केरोसीनचा पुरवठा करणाèया टँकर मधून केसोसीनची चोरी करताना अर्जुनी-मोर चे उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार सिद्धार्थ भंडारे यांनी रंगेहात पकडल्याची घटना १६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी तहसीलदार भंडारे यांच्या तक्रारीवरून अर्जुनी-मोर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून संबंधित आरोपींना अटक केली आहे.
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत तालुक्यात केरोसीनचा पुरवठा करण्यासाठी १६ जुलै रोजी रात्री ९.३० चे दरण्यान तहसील कार्यालय अर्जुनी-मोर येथे केरोसीन भरलेला टँकर क्र. एम.एच. ३५ के-१२२९ आला. यावेळी तहसीलदार भंडारे यांनी कागदपत्र व केसोसीनची तपासणी केली. टँकरमध्ये १२ हजार लिटर केसोसीन असल्याचे कागदपत्रावरून नमुद होते. दरम्यान केरोसीनचा टँकर तहसील कार्यालयासमोर उभे करण्यास तहसीलदार यांनी सांगितले. त्यातच तहसीलदार भंडारे हे आपत्ती व्यवस्थापक नियंत्रण कक्षाचे काम पाहण्यासाठी गेले असता टँकर तहसील परिसरात दिसला नाही. त्यामुळे तहसीलदार यांनी तिथे उपस्थित कोतवाल व होमगार्ड यांचे मदतीने टँकरची शोधा-शोध केली. मात्र केसोसीन टँकर तहसील कार्यालयासमोरील पेट्रोल पंपावर विद्युत प्रकाशात उभा असल्याचे निदर्शनास आले. तहसीलदार यांनी लगेच कोतवाल शरद रामटेके व होमगार्ड संजय पटले यांचासह पेट्रोल पंपावर रात्री १०.३० वाजता गेले असताना त्या ठिकाणी केरोसीन टँकरचे चालक सम्मदअली अब्बासअली सय्यद व त्याचा मदतनिस शहाबाज हैदरअली सय्यद रा. गोंदिया हे टँकरच्या नोझल मधून केरोसीन एका बादलीत काढत असतांना दिसले. तसेच त्यांचे बाजूला पेट्रोल पंपावर काम करणारे दोन इसम हे कॅन घेवून उभे होते. यामध्ये माणीक श्रीराम कापगते रा. लेंडेझरी व तुकाराम मनोहर वलथरे रा. qपपळगाव हे दोन्ही कर्मचारी संबंधित पेट्रोल पंपाचे कर्मचारी असल्याचे समजते. तहसीलदार यांनी हा प्रकरा बघताच कारवाई करत अंदाजे १५ लीटर केरोसीन आणि एक रिकामी प्लॉस्टीक कॅन जप्त करून घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी अर्जुनी-मोर पोलिसात तक्रार नोंदविली असून ठाणेदार नामदेव बंडगर व सहा. पो.नि. राजेश गज्जल यांनी घटनास्थळी येवून चौकशी केल्या नंतर तहसीलदार यांच्या तक्रारीवरून जिवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ आणि ७ भांदवी ३७९, ४११-३४ अन्वये गुन्हा दाखल करून टँकर qकमत १२ लाख १२ हजार लिटर केरोशीन qकमत १ लाख ६३ हजार ६३३ व इतर साहित्य ४८० असा एकूण १३ लाख ६४ हजार ११३ रुपयाचा माल जप्त केले. या प्रकरणी चारही आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली. अवैधरित्या टँकरमधून केरोसीनची चोरी करतांना रंगेहात पकडण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे केरोसीन चोरीचे रॅकट जिल्हाभर तर नाही न अशी शंका व्यक्त होत आहे.