पत्रकार राजू मस्के यांना पितृशोक

0
23

नगारजी मस्के यांचे मृत्यूपश्चात नेत्रदान
भंडारा ः देशबंधू वॉर्ड, भंडारा येथील रहिवासी माजी सहायक पोलिस उपनिरीक्षक नगारजी नारायण मस्के (वय ८५) यांचे मंगळवारी (ता. २४) निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूपश्चात नेत्रदान करण्यात आले. त्यानंतर दुपारी त्यांच्या पार्थिवावर वैनगंगा नदीकाठी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.महाराष्ट्र टाईम्स व लोकशाही वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी राजू मस्के यांचे ते वडील होत.त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, दोन मुले, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे.