जिल्हा परिषद शाळा डांगुर्ली येथे तंबाखू विरोधी अभियान

0
22

गोंदिया,दि.२८ः राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया यांच्या एकत्रित सहकार्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांच्या मार्गदर्शनाख़ाली गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा डांगुर्ली येथे शाळेतील  विद्यार्थांना तंबाखुविरोधी धडे ,आरोग्य शिक्षण व तपासणी करुन तंबाखु विरोधी अभियान राबविण्यात आल्याची माहीती डॉ.अमोल राठोड यांनी दिली आहे. अभियानात 267 मुलांची मुख आरोग्य तपासणी डॉ.अमोल राठोड यांनी केली.
राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम यानी सदर भेटीद्वारे विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत समुपदेशन करण्यात आले. त्या मध्ये तंबाखु व्यसन सोडण्याची माहीती ,तोड़ांचा व्यायाम  या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.तसेच त्यांना मौखिक स्वच्छतेबाबत माहिती सांगण्यात आली.
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. लहान वयातच मुलांनी तंबाखू खाण्यास सुरुवात केल्यास तरुणपणात कर्करोगाच्या विळख्यात अडकतात. तंबाखू सेवन आरोग्यास हानिकारक हा संदेश लहान वयातच मुलांना मिळाल्यास तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होईल यासाठीच जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती अभियान सुरू करण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी दिली आहे.
तंबाखू मुळे कर्करोग होतो हे सत्य आहे ते वैज्ञानिक दृष्ट्या ही सिद्ध झाले आहे तंबाखू मुळे कर्करोग होत नाही असे म्हणणाऱ्यांशी आम्ही सहमत नाही. लवकर निदान झाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.तंबाखू मध्ये असलेले निकोटीन अत्यंत व्यसनाधीन आहे आणि तंबाखूचा वापर हा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आणि श्वसन रोग तसे वीस पेक्षा जास्त विविध प्रकारचे किंवा कर्करोगाची उपप्रकार आणि इतर अनेक दुर्बल आरोग्य परिस्थितीसाठी एक प्रमुख जोखीम घटक आहे. धूम्रपानं करणाऱ्यांसाठी ही तंबाखू घातक ठरू शकते दुसऱ्या हाताने धुराचा प्रादुर्भाव देखील प्रतिकूल आरोग्य परिणामांमध्ये गुंतला आहे त्यामुळे दरवर्षी दीड लक्ष दशलक्ष मृत्यू होतात.जवळजवळ निम्मी मुले तंबाखूच्या धुरामुळे प्रदूषित हवेत श्वास घेतात आणि दरवर्षी 65000 मुले दुसऱ्या हाताच्या धुरामुळे होणाऱ्या आजारांमुळे मरतात. गरोदर असताना धूम्रपान केल्याने बाळांना आयुष्यभर आरोग्याची अनेक गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.