वर्ष 2024 मध्ये जिल्ह्यातील 40 शाळा तंबाखूमुक्त

0
27

गोंदिया-जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया यांच्या एकत्रित सहकार्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू मुक्त शाळा हा उपक्रम सुरू असुन जिल्हा अंतर्गत आठही तालुक्यातील शाळेत भेटी देवुन तंबाखु व्यसनाची जनजागृती,मौखिक तपासणी सोबत समुपदेशन व उपचार हे माध्यम वापरण्यावर भर देणात येत आहे.
शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे.मात्र तरी देखील याला हरताळ फासत काही ठिकाणी विक्री होत असल्याचे निदर्शनास येते.त्यामुळे राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू मुक्त शाळा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातून वर्ष 2024 मध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 40 शाळा या तंबाखूमुक्त केल्या असल्याचे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सल्लागार डॉ.ज्योती राठोड यांनी दिली आहे.
तंबाखू सारख्या व्यसनांनी समाजाला ग्रासले आहे तंबाखू मुळे कर्करोग होतो तसेच इतर गंभीर आजार देखील बळवतात त्यामुळे देशाची भावी पिढी यावेळी व्यसनांपासून दूर राहावी म्हणून शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांची जागृती करत असतात त्याचाच एक भाग म्हणून शाळा व शाळा परिसर हा तंबाखू मुक्त शाळा म्हणून ओळखला जावा या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेच्या आवारात जनजागृतीचे फलक लावण्यात येत आहे तसेच ज्या शाळा तंबाखू मुक्तीचे 11 निकष पूर्ण करतील अशा शाळा या तंबाखू मुक्त म्हणून घोषित करण्यात येत असतात
जिल्ह्यातील 40 शाळांनी तंबाखू मुक्तीचे 11 निकष पूर्ण केले असून या शाळा तंबाखूमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे.त्यात गोंदिया तालुक्यातील 23, तिरोडा तालुक्यातील 4,गोरेगाव,सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रत्येकी 3,आमगाव तालुक्यातील 2,सालेकसा व देवरी तालुक्यातील प्रत्येकी एक असे एकुण वर्ष 2024 मध्ये 40 शाळा तंबाखूमुक्त करण्यात आरोग्य विभाग सरसवला आहे.शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमाचे अधिकारी, समन्वयक,कर्मचारी, शाळेतील शिक्षकवृंद ,मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील वर्ष 2024 मध्ये 40 शाळा तंबाखूमुक्त झाले आहेत इतर तालुक्यातील शाळा देखील लवकरच तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील करणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी म्हटले आहे.
शाळेत तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांची स्पर्धा घेऊन बक्षीस वितरित करण्यात येतात.त्यात मुलांना प्रोत्साहनपर टीफीन बैग, लंच बॉक्स, कलर पेन, साधे पेन, पाणी बॉटल यासार्खे साहित्य वितरित करण्यात येत असल्याची माहीती मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम यांनी दिली आहे.अभियाना दरम्यान सर्व शिक्षक व विद्यार्थी याना तंबाखु मुक्तीची शपथ सामाजिक कार्यकर्ता संध्या संभरकर यांचे मार्फत देण्यात येत असते. तर मुलांची मौखिक तपासणी विशेष तज्ञ डॉ. अनिल आटे, डॉ. अमोल राठोड व दंत सहाय्यक विवेकानंद कोरे यांचे मार्फत होत असते.