३६ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा गोंदिया शुभारंभ

0
43

गोंदिया,दि.०२ः गोंदिया उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने ३६ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उदघाटन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयात पार पडले.सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नागेश भास्कर, पोलिस निरीक्षक (जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया) हे उपस्थित होते.मोटर वाहन निरिक्षक ओमप्रकाश सयाम यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियांतर्गत घेण्यात येणारे विविध उपक्रमाबद्दल सर्वांना माहिती दिली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी लोकांना टू व्हीलर चालवताना हेल्मेट व फोर व्हीलर चालविताना सीट बेल्टचा वापर करण्याचे आवाहन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन अमीत रौंदळ यांनी केले,तर प्रास्ताविक पंकज आनंदपुरे यांनी केले.कार्यक्रमाचे समारोपीय आभार प्रसाद सुर्वासे यांनी मानले.