अर्जुनी मोर– ०१ जानेवारी २०२५ रोज बुधवार ला साकेत बौद्ध विहार सिरोली येथे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व माता रमाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या शुभहस्ते व सामाजिक कार्यकर्ते यशवंत सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी आपलं मत व्यक्त करताना म्हणाले की,आज नववर्षाच्या शुभप्रसंगी सिरोली येथील समाज बांधव व गावकऱ्यांनी सुंदर असा कार्यक्रम घडवून आणला.ज्या महामानवांनी आपल्या जीवाचे रान करुन आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला त्या महामानवांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मला दिली त्याबद्दल आपणा सर्वांचा मी आभार मानतो.महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा फुले,आई सावित्रीबाई फुले व माता रमाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले परंतु त्यांनी केलेले कार्य डोळ्यासमोर ठेवून आपणही त्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे व त्यांचे विचार आचरणात आणावे.कारण एक चांगला विचार शंभर वाईट विचारांना नष्ट करतो.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आजचे युग हे स्पर्धेचे तंत्रज्ञानाचे विज्ञानाचे युग आहे आणि या युगात टिकून राहण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे म्हणून आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणुन त्यांच्यावर चांगले संस्कार निर्माण करावे.चांगल्या विचारांची व संस्काराची आजच्या पिढीला गरज आहे.आजची पिढी कुठे तरी भटकत आहे म्हणून ही भटकंती थांबविण्यासाठी चांगले संस्कार, दर्जेदार शिक्षण व चांगल्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडायला हवा तरच ही पिढी सुज्ञ,तज्ञ, सुसंस्कृत आणि सृजनशील बनेल.म्हणतात ना,विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहुन,तिचा साठा जयापाशी,ज्ञानी तो मानती जन, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम पत्नीला शिकवुन मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.त्या काळातील व्यवस्थेने स्त्रीयांना चुल आणि मुल ह्यातच गुंतवुण ठेवले परंतु व्यवस्थेचा विरोध झुगारून काढत स्त्री शिक्षणाची गंगोत्री आणली.म्हणुन त्यांनी केलेले कार्य त्यांचे आपण आत्मसात करुन आपले जीवनमान बदलावे.असे आवाहन विचारमंचावरून केले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्या कविता कापगते, सरपंच नाजुक लसुंते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल दहिवले, इतिहास विषय तज्ञ प्राध्यापक डॉ आदे, आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक मुन्नाभाई नंदागवळी, पंचायत समिती सदस्य प्रमोद लांडगे, सामाजिक कार्यकर्ते डॉ भारत लाडे व मोठ्या संख्येने समाज बांधव तथा गावकरी उपस्थित होते.