विदर्भात गोंदियात सर्वाधिक कमी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

0
51

गोंदिया,दि.०३ः राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. आधी कडाक्याची थंडी, त्यानंतर पाऊस आणि आता पुन्हा एकदा थंडी परतली आहे.आज ३ जानेवारीला विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे ८.८ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवण्यात आले.त्यापाठोपाठ नागपूर येथे ९.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.२ जानेवारीला नागपूरचे तापमान ८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते.तर गोंदियाचे तापमान ९.८अंश सेल्सिअस नोंदवले होते.

गेल्या वर्षात राज्यातील वातावरणात सातत्याने बदल घडून आले. आता नवीन वर्षातही वातावरणात बदल दिसून येत आहे. डिसेंबर अखेरीस राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा थंडीने जोर पकडला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पारा घसरलाय. त्यामुळे त्याठिकाणी गुलाबी जाणवत आहे. तर विदर्भात मात्र अवघ्या २४ तासात वातावरणात बदल झाला आहे. अवघ्या २४ तासात किमान तापमान साडेपाच अंशाने कमी झाले आहे.