मुल्ला येथे त्रिदिवसीय भव्य शंकरपटाचे आयोजन येत्या २० पासून

0
195

देवरी,दि.८- तालुक्यातील मुल्ला येथील नवयुवक शंकरपट समितीच्या वतीने त्रिदिवसीय भव्य इनामी शंकरपटाचे आयोजन येत्या २० जानेवारी रोजी केले आहे.

या शंकरपटाच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कल्पना बागडे, देवरी पंचायत समितीचे उपसभापती अनिल बिसेन, माजी आमदार सहसराम कोरोटे, गोंदिया जि.प.सभापती सविता पुराम, जिप सदस्य कल्पना वालदे, मुल्ला आरोग्य केंद्राचे सुनील येरणे, चारभाटाचे सरपंच कैलाश मरस्कोल्हे, माजी पंचायत समिती सदस्य सुनंदा बहेकार, वडेगावच्या सरपंच अंजू बिसेन, मुल्लाच्या उपसरपंच सोनू मेंढे, पोलिसपाटील ललिता भुते, डॉ. आनंद कुकडे, दिलीप श्रीवास्तव, पुरणलाल मटाले, देवरी पंचायत समितीच्या सदस्य शामकला गावड आदी मान्यवर उपस्थित राहतील.

स्पर्धेत विजेत्या बैलजोड्यांना प्रथम पुरस्कार म्हणून ३१ हजार, द्वितिय २२  हजार, तृतीय १८ हजार, चतुर्थ १२ हजार, पाचवा ८ हजार, सहावा ६ हजार, सात ते दहा ५ हजार, ११ ते १५ चार हजार. सोळा ते एकवीस ३ हजार ५००, बावीस  ते तीस पर्यंत ३ हजार, एकतीस ते चाळीस पर्यंत २ हजार ५००, एकचाळीसला २ हजार १००, बेचाळीस ते एकोणपन्नास पर्यत २ हजार, पन्नासाव्या क्रमांकाला २ हजार २०० एक्कावन ते पुढील सर्व विजेत्यांना १ हजार ७०० रुपये रोख पुरस्कार देण्यात येईल.

तरी इच्छुकांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी ८५५१९०३२७२, ९६२३१४४५३२, ८५५२०५५९१८ आणि ८७८०६३८५२२ या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.