= चला एकदा या शाळेला भेट देवु या
अर्जुनी मोर.-” केल्याने होत आहे रे,आधी केलेच पाहीजे ” मनात प्रचंड इच्छाशक्ती किंवा दृढनिश्चय असला की कोणतीही गोष्ट कठीण नसते.याचे प्रत्यंतर अर्जुनी मोर.तालुक्यातील सिरेगावबांध या गावात पहायला मिळते,सानगडी-नवेगांवबांध रोडवर काही अंतरावर असलेले सिरेगावबांध, या गावातील प्रवेशद्वारातुन प्रवेश केला की या स्मार्ट ग्रामची प्रचिती येते.संपुर्ण सिसिटिवीच्या निगरानीत हे गाव विवीध पुरस्कार प्राप्त आहे.अशा या स्मार्ट गावात शहरातील शाळांना हेवा वाटावा आणी जिल्ह्यातील शाळांनी सहलीच्या माध्यमातुन एकदा या शाळेला भेट द्यावी अशा अत्याधुनिक सोयीसुविधाने सिरेगावबांध ची डिजीटल जि.प.प्राथमिक शाळा सज्ज आहे.
अर्जुनी मोर.तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायत माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच इंजी.हेमकृष्ण संग्रामे यांचे कार्यकर्तृत्वाने विदर्भ, महाराष्ट्रासह देशात नावलौकिक प्राप्त आहे. विज,पाणीपुरवठा,शिक्षण,आरोग्य, रंगरंगोटी,सुंदर रस्ते,सुसज्ज नाल्या,ग्रामसफाई, अशा सुसज्ज व्यवस्थेने परिपूर्ण असलेल्या या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्वबाबीने सुसज्ज आहे.जि.प.आदर्श डिजीटल वरिष्ठ प्राथमिक शाळा सिरेगावबांध येथे 1 ते 8 पर्यंत वर्ग असुन पटसंख्या 101 आहे.चार शिक्षक व चार स्वंयसेवक अध्यापनाचे काम करतात. शिक्षणाबरोबरच येथे संस्काराचे धडेही येथे दिल्या जाते.या शाळेत प्रत्येक वर्ग डिजीटल असुन प्रत्येक वर्गात टिव्ही ची व्यवस्था आहे. प्रत्येक वर्गात पंखे व शुध्द पिण्याचे पाण्याची व्यवस्था आहे.पावसाचे पाणी वाॅटर हारवेस्टींग व फिल्टर करुन विहिरीत सोडले जाते. प्रशस्त क्रीडांगण,शौचालय ,बाथरुमची स्वतंत्र व्यवस्था,ग्रंथालय,विज्ञानकक्ष, संगणक कक्ष,प्रशस्त ईमारत,रंगरंगोटी,सुसज्ज बागबगीचे,व संपुर्ण शाळा सिसिटिव्ही च्या निगराणीखाली आहे.निसर्गाचे वरदहस्त असल्याप्रमाणे दिसणारा शालेय परिसर,सुंदर शाळेची ईमारत भेट देणा-यांचे मन मोहुन टाकते.मुख्याध्यापक टि.के.ठवकर यांचे कार्यकर्तृत्वात सध्या अध्यापनाचे काम सुरु आहे.सिरेगांवबांध च्या विद्यमान सरपंच सागरताई चिमणकर यांचे कार्यकाळात माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच इंजी.हेमकृष्ण संग्रामे यांचे कुशल नेतृत्वातुन सिरेगावबांध ग्रामपंचायत यशाच्या प्रचंड शिखरावर झेप घेत आहे.चला तर मग एकदा सिरेगावबांध ला भेट देवु या.