वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश
लाखांदूर : जंगल परिसरात शिकार मिळत नसल्याने शिकारीच्या शोधात किटाळी, गोंदी देवरी जंगलातून एक पट्टेदार वाघ दि.8 जानेवारी रोजी पहाटे 6 च्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील तई गावाशेजारी असलेल्या वाकल ते तई मार्गांवरील नाल्यानजीक येऊन एका झाडाच्या झुडपाचा सहारा घेत तिथेच ठिय्या मांडून बसलेल्या (Striped Tiger) वाघोबाचे प्रत्यक्ष दर्शन रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना घडले.
याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी वाघोबाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर काही हुल्लड नागरिकांनी वाघोबा सोबत 4 ते 5 फूट अंतरावरून फोटो शेशन केल्याचे सांगण्यात येते. सदर (Striped Tiger) पत्तेदार वाघाला हुशकावून लावण्यासाठी गोटे मारल्याचाही संतापजनक प्रकार ऐकायला मिळत आहे. सदर पट्टेदार वाघ हा मागील काही दिवसापासून किटाळी जंगलात वास्तव्यास असून त्याचे नागरिकांना अनेकदा प्रत्यक्ष दर्शन घडत असल्याने परिसरातील नागरिकांत दहशतिचे वातावरण होते.
यापूर्वीसुद्धा सदर वाघ (Striped Tiger) हा हरदोली गावात येऊन एका जनावरावर हल्ला करून तिथेच सहा तास ठिय्या मांडून बसलेला होता. तेव्हा वन विभागाच्या पथकाणे जे्रबंद करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना हुसकावणी देत गोंदी देवरी जंगलात पळ काढला होता. आज अचानकपने तई ते वाकल रस्त्यावरील नागऱ्या नाल्यालगतच्या झुडपात रस्त्याने ये जा करणाऱ्या वाटसरून हा पट्टेदार वाघ दिसून आला. याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून वाघाला बेहोषीचे इंजेक्शन मारून (Striped Tiger) वाघाला जेरबंध केले. हा सगळा थरार आज सकाळी 7 वाजेपासून ते 1 वाजतापर्यंत सुरु होता. वाघाला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.