एकोडीचे ग्राम पंचायत सदस्य बिसेन अपात्र;अतिक्रमण करणे भोवले

0
476

गोंदिया : तालुक्यातील एकोडी येथील ग्राम पंचायत सदस्य नामदेव मोहन बिसेन यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून घर बांधकाम केले. या प्रकरणाची तक्रार अर्जदाराने जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे केली होती. या प्रकरणाची दखल घेत अतिक्रमण करणारे ग्राम पंचायत सदस्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात ३१ डिसेंबर रोजी आदेश पारीत करून संबधितांना सुचना देण्यात आली आहे.
सविस्तर असे की, नामदेव मोहन बिसेन हे ग्राम पंचायत एकोडीचे सदस्य आहेत. सन २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ते वार्ड क्र.४ येथून ग्राम पंचायतीवर निवडून गेले. ग्राम पंचायत सदस्य पदावर विराजमान असूनही त्यांनी सन २०२० मध्ये शासकीय गट क्र.१४८४ आराजी ०.०२ हे.आर.वर अतिक्रमण करून घर तयार केले आहे. सदर बांधकाम करताना त्यांनी शासकीय प्राधिकरणाची कसलीही परवानगी घेतली नसून तलाठी रेकॉर्डप्रमाणे गाव नमुना १ ई मध्ये अतिक्रमणाची नोंद आहे. या संदर्भात ग्रा.प.सदस्य बिसेन यांनी ग्राम पंचायतमध्ये फेरकार केले. त्यामुळे मालमत्ता क्र.८२१ ग्राम पंचायत नमुना ८ मध्ये कराची नोंद आहे. तसेच अतिक्रमण करून तयार करण्यात आलेल्या घरात राहत आहेत. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियमचे कलम १४ (१) (ज-३) नुसार अतिक्रमणकर्ता सदस्य पद धारण करण्यास अनर्ह ठरविण्यात यावे, अशी तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे अर्जदाराने केली होती. या तक्रारीची शहनिशा करून संबधितांना यावर जाब विचारण्यात आली. दरम्यान केलेली चौकशी आणि पुराव्यात ग्राम पंचायत सदस्य नामदेव बिसेन यांनी अतिक्रमण केल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. या संदर्भात ३१ डिसेंबर रोजी आदेश पारीत करून संबधितांना सुचना देण्यात आली आहे.