अर्जुनी मोर.– स्व. जतीरामजी बर्वे यांनी स्वार्थ बाजूला ठेऊन सेवाभावाने आपले संपूर्ण आयुष्य देश आणि समाजाच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी समर्पित केले.त्यांचे विचारांचे अनुसरुन करीत समाजबांधवानी उज्वल भविष्याकरीता शिक्षणाची कास धरावी असे विचार डाॅ.भरत लाडे यांनी व्यक्त केले.ते केवटराम मत्स्य संस्था,आणी ढिवर समाज संघटना मोरगाव च्या वतीने ता.16 जानेवारी ला आयोजित मत्स्यमहर्षी ( खासदार )स्व.जतीराम बर्वे यांचे पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात विशेष मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सर्वप्रथम स्व.जतीराम बर्वे यांचे प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कविताताई कापगते जि. प. स. गोंदिया, श्रीदानजी पालिवाल, गीताताई नेवारे सरपंच ग्रा. मोर., शालूताई कोल्हे सामाजिक कार्यकर्त्यां,रमेशजी लाडे. अध्यक्ष म. गांधी. तं. स. मोर., कैलास चाचेरे अध्यक्ष मत्स्य संस्था. मोर. प्रमोदजी नेवारे सामाजिक कार्यकर्ता, वासुदेव खेळकर,चेतराम मेश्राम, मुरारी उईके, तानाजी लोधी,अशोक कांबळे,सरिताताई मेश्राम, दुर्गाबाई सोनवणे, सोनूताई कऱ्हाडे, विद्या शहारे, माधुरीताई सिंगणजुडे, प्रमिला शहारे, पदमीना चचाणे,मंदा शहारे,शालिक शहारे, देवानंद शहारे,कैलास कुंभरे, प्रकाश वाढई,मोतीराम मेश्राम, मन्साराम कोल्हे, आनंदराव लाडे,विठ्ठल सोनवाणे, धनराज मेश्राम,नितेश शहारे, कुणाल मेश्राम, राजेश कांबळे आणि समाजबांधव उपस्थित होते.