गोंदिया : गोंदिया जिल्हयातील सर्व 16 पोलीस ठाणे स्तरावर पोलीस ठाण्यास प्रलंबित असलेल्या जनतेच्या तक्रारीच्या निराकरणाच्या अनुषंगाने तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या तक्रार निवारण दिनाचे आयोजन दर शनिवारी पोलिस ठाणे येथे करण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यास प्रलंबित असणाऱ्या तक्रारीच्या जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांचे प्रलंबित तक्रारीचे निवारण करण्यासाठी संबंधित पोलिस स्टेशनला समक्ष उपस्थित राहुन निराकरण करावे. सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.