गोंदिया,दि.१८ः- राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आज १८ जानेवारी रोजी राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री देण्यात आले.त्यानुसार गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे राखत सह पालकमंत्री म्हणून शिवसेनेचे राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांची नियुक्ती केली आहे.तर गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असलेले राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती केली आहे.बाबासाहेब पाटील हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.तर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संजय सावकारे यांची निवड करण्यात आली आहे.