चंद्रपूर : बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावर रक्सौल एक्स्प्रेसने सिंदेवाही-आलेवाही जवळ एका वाघाला धडक दिल्याने वाघाचा जागीच मृत्यू झाला आहे. बल्लारशा- गोंदिया रेल्वे मार्ग वाघासाठी कर्दनकाळ ठरत आहे. बल्लारशा-गोंदिया मार्गांवर मेमू गाड्यसह अन्य रेल्वे गाड्या धावतात. रविवारी सकाळी रक्सौल एक्स्प्रेसच्या धडकेत वाघ मृत झाल्याची घटना उघडकीस आली आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभाग व रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासनिसाठी पाठविण्यात आला आहे. यापूर्वी या रेल्वे मार्गांवर वाघीनीचा बछडा मृतावस्थेत आढळून आला होता हे विशेष.