गोंदिया, दि.20 :नेत्रदानाचा संकल्प प्रत्येकाने करावा व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे. नेत्रदान हेच श्रेष्ठ दान असल्याचे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी गोंदियावासियांना केले आहे.आरोग्य विभागाचे जनजागृतीमुळे के.टी.एस.रुग्णालयातील नेत्र विभागात 605 लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केलेला आहे.
मागील वर्षी 2024 मध्ये के.टी.एस.रुग्णालयातील नेत्र विभागात 30 व्यक्तींनी नेत्रदान करुन अंधारलेल्या व्यंक्तीना नविन जग पहावयासाठी पुण्याचे काम केलेले असल्याचे नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले यांनी माहीती दिली आहे.अंधारलेल्याचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी नेत्रदानाच्या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप देणे आवश्यक आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते.त्यामुळे नेत्रदानाचा संकल्प प्रत्येकाने करावा व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. के.टी.एस.रुग्णालयातील नेत्र विभागाकडुन शासनामार्फत नेत्रदान केल्याबद्दल संबधित व्यक्ती/परिवाराला प्रमाणपत्र बहाल करण्यात येत असते.
नेत्रदानाबाबत थोडे महत्वाचे-
नेत्रदान म्हणजे दात्याच्या मृत्यूनंतर त्याचे/तिचे डोळे दुसऱ्या कोणाला तरी दान करणे. ज्यांचे डोळे कॉर्नियल इन्फेक्शन मुळे खराब झाले आहेत, त्यांना नेत्रदानाचा फायदा होतो. ज्या लोकांना बुबूळाच्या विकारामुळे अंधत्व आले आहे अशा लोकांना दृष्टी प्रदान करण्यासाठी नेत्रदानाचा टक्का वाढणे आवश्यक आहे.
अंधत्वाची कारणे –
अंधत्वाची अनेक कारणे आहेत.डोळ्याला होणारी इजा,बुबूळाला होणाऱ्या जखमा, दिवाळीमध्ये अंसरक्षितरित्या पेटवलेले फटाके, कुपोषणामुळे, इन्फेक्शन जंतू प्रादुर्भाव,देवी, कांजण्या, आदीविकारांमुळे, डोळ्यात काही केमिकल्स गेल्यास,अनुवंशिकता आदीमुळे अंधत्व येऊ शकते.
नेत्रदान कोण करू शकतो-
नेत्रदान केवळ मृत्यूनंतर करता येते, बालकापासून वृद्धांपर्यंत कोणीही व्यक्ती नेत्रदान करू शकते. मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती, ज्यांना चष्मा आहे, रक्तदाब, मधुमेह,दमा आदी विकार असलेले नागरिकही नेत्रदान करू शकतात.
नेत्रदान कोण करू शकत नाही–
एड्स, लिव्हरचे आजार(हिपाटायटीस),सेप्टीसिमिया,
मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे
नेत्रदान करणाऱ्या व्यक्तिच्या मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे असते. ज्या व्यक्तिला नेत्रदानासाठी कॉर्नियाचा वापर करायचा आहे, त्याला 24 तासाच्या आत कॉर्नियाचे प्रत्यारोपन करणे गरजेचे असते. नेत्रदानाचा अर्थ शरिरातून संपूर्ण डोळा काढून घेणे असा होत नाही.यात मृत व्यक्तीच्या डोळ्याचा कॉर्नियाचा वापर करण्यात येतो.
तुम्हीही करू शकता नेत्रदान
नेत्रदानाची प्रक्रिया मृत्युच्या काही तासांमध्ये करण्यात येते आणि यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. एका मृत्यू झालेल्या व्यक्तीने डोळे एका नेत्रहीन व्यक्तीला देण्यात येते.त्यामुळे त्या अंध व्यक्तीचे प्रकाशमय होते.तुम्हालाही एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उजळून टाकायचे असेल तर के.टी.एस.रुग्णालयातील नेत्र विभागाकडे संपर्क करून नेत्रदानासाठी नोंदनी करू शकता.
कसे होते नेत्रसंकलन
नेत्रदानाही इच्छा व्यक्त केलेली व्यक्ती मृन पावली आणि त्यांच्या नातेवाईकांनी कळवले तर हे नेत्रसंकलन रुग्णालयात जावुन करण्यात येते.एमबीबीएस नोंदणीकृत डॉक्टरच नेत्र संकलन करू शकतात.यासाठी दहा में पांच मिनिटाचा कालावधी लागतो. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यादीही नेत्रपेढीकडे तयार असते.पुरस बुबुळ बाटलीत 48 तासापर्यंत ठेवता येतात. तसेच ईतर विशेष रसायनामध्ये दोन ते तीन आठवड्यांपर्यंत सुरक्षित ठेवता येतात. बुबुळ प्रत्यारोपित व्यकतीला याबाबत काहीही माहिती देण्यात येत नाही. मृत्युपूर्व नेत्रदानाचा संकल्प नसला तरीही मृतांच्या जवळील नातेवाईकही संमती देऊ शकतात.
ईच्छा पत्र भरले नसेल, तरीही नेत्रदान करता येते का –
नेत्रदानासाठी इच्छापत्र भरणे आवश्यक आहे.मृत व्यक्तीने नेत्रदानाचे इच्छापत्र भरले नसेल तरीही नातेवाईकांना त्या व्यक्तीचे नेत्रदान करता येते. डोळ्यातील बुबूळ मृत्यूनंतर सहा तासाचे आत काढावे लागतात.त्यामुळे मृत व्यक्तींचे नेत्रदान करावयाचे असल्यास लवकरात लवकर आरोग्य विभाग किंवा नेत्रपिढीशी संपर्क साधणे आवश्यक आहे.