94 बाधंकाम मजुरांची तपासणी, 70 एक्स-रे व 24 थुंकी नमुने तपासणी
गोंदिया, दि.20 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत निक्षय शिबीर संपन्न झाले.अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,प्राध्यापक डॉ.प्रदीप जुडा,डॉ.दुबे,डॉ. कुणाल गायकवाड,डॉ.वैभव तुरकर,डॉ.हर्षदीप मेश्राम,डॉ.जैनिश गांधी यांच्या उपस्थितीत निक्षय शिबीराचे उद्घाटन संपन्न झाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथील निक्षय शिबिरात 94 बाधंकाम मजुरांची क्षयरोगाबाबतची तपासणी करण्यात दि. 17 जानेवारी रोजी झालेल्या निक्षय शिबीरात बांधकाम मजुरांचे 70 एक्स-रे व 24 थुंकी नमुने गोळा करण्यात आल्याची माहीती डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.
अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे यांनी भारत सरकारच्या महत्वाकांक्षी धोरणानुसार सन २०२५ पर्यंत टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत टिबी वर मात करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातुन समाजातुन टीबी हद्दपार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.त्या दृष्टीने जिल्हयामध्ये शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत रुग्णशोध मोहिम दि.७ डिसेंबर २०२४ पासुन सुरु करण्यात आली असुन जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेत नविन क्षयरुग्णांचे शोध मोहिम राबवुन मोफत औषधोपचार देण्यात येत आहे.क्षयरोगाचा प्रसार थुंकीद्वारे एका रुग्णापासुन दुस-याला होत असतो.क्षयरोग हा मायक्रोबॅक्टोअिम ट्युबरक्युलोसिस नावाच्या या जंतुमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावर क्षयरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.क्षयरोग प्रसाराचे प्रमाण कमी करणे व मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने दि. ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ पर्यत १०० दिवसीय क्षयरोग मोहिम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
या मोहिमेत निक्षय शिबिराद्वारे कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक व अतिजोखमीच्या लोकसंख्येची तपासणी करण्यात येत असुन त्यामध्ये २ आठवडेपेक्षा जास्त दिवसाचा खोकला, मंदावणे, वजन कमी होणे, छातीत दुखणे, संध्याकाळी येणारा हलका ताप, थुंकीवाटे रक्त पडणे, पुर्वी क्षयरोग झालेले क्षयरोग बाधित रुग्णाच्या सहवासीत, एचआयव्ही बाधित रुग्ण, कुपोषीत व्यक्ती, ६० वर्षावरील व्यक्ती, मधुमेह बाधित, धुम्रपान करणारे व्यक्ती झोपडपट्टीमध्ये म्हणजे दाटीवाटी मध्ये राहणारे लोक, आश्रमशाळा येथील विद्यार्थी, सफाई कर्मचारी यांची क्षयरोगाबाबतची तपासणी करण्यात येत आहे.तपासणी अंती निदान झालेल्या संशयित रुग्णांचे मोफत एक्स-रे/ थुंकी नमुने तपासण्यात येत असल्याचे सांगितले.
आशा कल्प संस्थेमार्फत एक्स-रे तपासणी करण्यात येत असून संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुने घेऊन जिल्हा क्षयरोग केंद्र गोंदिया येथील प्रयोगशाळेत (डीएमसी) येथे सॅम्पल तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ.देव चांदेवार यांनी सांगितले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील निक्षय शिबिर यशस्वी करण्यासाठी क्षयरोग विभागाचे डॉ.वेदप्रकाश चौरागडे,डॉ.देव चांदेवार,जिल्हा कार्यक्रम समन्वयक कटरे,जिल्हा पीपीएम समन्वयक प्रज्ञा कांबळे,केटीएस सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.निखिल डोंगरे,क्षयरोग पर्यवेक्षक हरिश चींधालोरे,उर्मिला बघेले,टीबीएचव्ही आकाश चुन्ने,योगिता अडसड,आरोग्य सेविका वर्षा बोरकर,राखी गौतम,स्टाफ नर्स पायल गौतम,एक्स-रे टेक्निशियन इंदरजी,एनजीओचे अनिकेत राऊत,आशिष बावनथडे,प्रीत कांबळे यांनी पुढाकार घेउन आरोग्य सेवा प्रदान केली.