देसाईगंज शहरात कलार समाजाच्या महिलांचे हळदीकुंकू व स्नेहमिलन संपन्न

0
226

देसाईगंज (सौ.प्रिती वैरागडे)-देसाईगंज शहरातील स्थानिक कलार समाज संघटनेच्या वतीने कलार समाज महिलांचा हळदीकुंकू व स्नेह मिलन सोहळा रविवार दि. १९ जानेवारी २०२५ ला नैनपुर रोडवरील माता वार्डातील माता मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर हळदीकुंकू व स्नेह मिलन सोहळ्याला प्रमुख पाहुणे स्वाती मैदमवार व निकिता कुथे महात्मा गांधी विद्यालय वडसा प्रामुख्याने उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात शारदा मातेच्या फोटोला माल्या अर्पणाने व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश वंदना प्रगती डाबरे यांनी केले.एकल नृत्य मीना डाबरे यांनी केले.कार्यक्रमात लहान मुलांची लूट करून त्यांचा आनंद द्विगणित करण्यात आला.
या हळदीकुंकू व स्नेह मिलन सोहळ्यातील कार्यक्रमात उत्कृष्ट महाराष्ट्रीयन लुक व वेशभूषा स्पर्धा देखील घेण्यात आली.या स्पर्धेत प्रथम क्रमांक चेतना शेंडे तर द्वितीय क्रमांक जागृती हरडे यांनी पटकावला.दुसरी स्पर्धा उखाणे घेण्याची स्पर्धा घेण्यात आली.त्यात प्रथम क्रमांक साक्षी खेडीकर तर द्वितीय क्रमांक प्रिया बडवाईक यांनी पटकाविला. यावेळी महिलांनी हळदीकुंकू व वाण वाटप केले.
या कार्यक्रमात कलार समाजातील सर्वच महिला मंडळींनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन सौ स्मिता दहीकर तर आभार प्रदर्शन जागृती हरडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनानी झाली.