शिवाजी विद्यालयात वर्ग १२वी विद्यार्थ्यांकरीता निरोप समारंंभ संपन्न

0
135

देवरी,दि.२३ – स्थानिक छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वर्ग ११वी च्या विद्यार्थ्यांकडून वर्ग १२वी विद्यार्थ्यांकरीता आज (दि.२३) गुरुवारला निरोप समारंंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. एम. जी. भुरे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. आर. एस. डोये, से. नि. शिक्षिका जे. व्ही. वाघमारे, अशोक भांडारकर, संजय भगवतकर, विलास हिडामे, एस. टी. भांडारकर या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. वर्ग १२वी विज्ञान मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी कु. लावण्णिका विजय कापसे या विद्यार्थीनीची आदर्श विद्यार्थीनी म्हणून मोमेंटो देऊन निवड करण्यात आली. याप्रसंगी आदर्श विद्यार्थीनी व इतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तद्नंतर मागील वर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी विषयामध्ये सर्वाधिक गुण घेणाऱ्या हितेश दानचू नरेटी व वैभवी संजय भगवतकर या दोन विद्यार्थ्यांना प्रा. एम. एस. रहांगडाले, ककोडी यांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतीथी यांचे हस्ते स्मृतीचिन्ह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले व येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक एस. टी. भांडारकर, संचालन चांदनी बहेकार, सिद्धी चौधरी तसेच उपस्थितांचे आभार कसक भोयर यांनी मानले.