माजी जि.प.सदस्य नंदूभाऊ समरीत यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश तर ठाकचंद मुंगूसमारे यांची घरवापसी

0
130

गोंदिया,दि.२३ः-राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय गोंदिया येथे खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व विकासाला साथ देण्यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन व आमदार राजु कारेमोरे यांच्या हस्ते दुपट्टा वापरून साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथिल प्रतिष्ठीत नागरिक व माजी जिल्हा परिषद सदस्य नंदूभाऊ समरित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर माजी जिल्हा परिषद सदस्य, आष्ठी (तुमसर) येथिल ठाकचंद मुंगुसमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घर वापसी केली. या प्रवेशामुळे भंडारा जिल्हयात पक्षाला निश्चितच बळकटी मिळणार आहे. यावेळी प्रामुख्याने माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजु कारेमोरे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, देवचंद ठाकरे, रामदयाल पारधी, यशवंत सोनकुसरे सह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.