अर्जुनी मोरगाव,दि.२४ः- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अर्जुनी मोरगाव अंतर्गत सत्यमेव प्रभाग संघ नवेगाव/बांध संलग्नित महिला शक्ती ग्रामसंघ देवलगांव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा दि 24 जानेवारीला उत्साहात पार पडला.
सभेच्या अध्यक्षस्थानी महिला शक्ती ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ.बुद्धरत्नाताई नंदागवळी होत्या.उद्घाटक सौ.दिपालीताई कापगते सरपंच,सहउद्घाटक माजी उपसभापती होमराज पुस्तोडे ,दिपप्रज्वलक सौ.भीमाबाई शहारे मा. प्रभागसंघ अध्यक्ष तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. शारदाताई डोंगरवार अध्यक्ष प्रभागसंघ,श्री.तामदेवजी कापगते उपसरपंच,श्री.प्रकाशजी मेश्राम सर प्रभाग समन्वयक,सौ.रेखाताई राऊत सचिव ग्रामसंघ,सौ, इंदूताई पुस्तोडे,कु.एस.बी. राऊत मॅडम ग्रामसेविका,चेतनाताई डोंगरवार कोषाध्यक्ष, हिराताई तरोणे सचिव,दुर्योधनजी आरसोडे पो.पा.,कालिदास पुस्तोडे, ललित सयाम,भगवानजी उके CLM, दिपाताई मेश्राम CAM, शामकलाताई औरासे CTC, गोपालजी सोनवाणे CFM,आचल शाहारे, सर्व ग्राम.पं.सदस्य आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज, माता सावित्रीबाई फुले, जिजामाता,संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आली.याप्रसंगी ग्रामसंघाच्या लेखापाल सपना राऊत यांनी ग्रामसंघाचे कार्य,वार्षिक नियोजन,जमा खर्च याचा आढावा सादर केला. दरम्यान माजी प्रभागसंघ अध्यक्षा भीमाबाई शहारे यांनी महिलांना महिला सशक्ष्मीकरण विषयी मार्गदर्शन केले,तसेच मंचावरील प्रमुख पाहुण्यांनी विविध शासकीय योजना,इतर विषयावर माहिती दिली,यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
सभेचे प्रास्ताविक पुष्पा कापगते यांनी केले. संचालन अल्का नाकाडे,तर आभार सारिका शेंडे यांनी केले. वरिल कार्यक्रम जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र रहांगडाले व तालूका अभियान व्यवस्थापक रेशिम नेवारे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.यावेळी विजेंद्र राऊत,किरण मस्के, चारूलता पुस्तोडे,अनिता उईक तसेच ग्रामसंघ पदाधिकाऱ्यांनी, सदस्यगण यांनी मोलाचे सहकार्य केले.