सालेकसा ; तालुक्यातील टोयागोंडी गावाजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास रेल्वे लाईन खांब क्रमांक ९४७/२७ जवळ एका सहा महिन्याच्या बिबट्याचा ट्रेनच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.रेल्वे प्रशासनाने या घटनेची माहिती तत्काळ सालेकसा वनविभागाला दिली. पहाटे ४:३० वाजता वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. नंतर मृत बिबट्याला सालेकसा येथे नेण्यात आले. वनविभागाने शवविच्छेदन करून नियमांनुसार बिबट्याचे अंत्यसंस्कार केले.घटनास्थळी वन परिक्षेत्र अधिकारी जी.एस. राठोड, वनपाल ब्राह्मणे, वनरक्षक बडोले,फुंडे, पोलीस पाटील बांबोळे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.