विविध उपक्रमांनी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

0
11
*मतदार नोंदणी करणाऱ्यांचा सत्कार
*नवमतदारांचा निवडणूक ओळखपत्र वाटप
अमरावती, दि. 25 : तहसील कार्यालयामध्ये 15 व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त कार्यक्रम पार पडला. यात विविध घटकांमध्ये मतदान जागृती करून मतदार नोंदणी केलेले नागरीक आणि नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र वाटप करण्यात आले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे, निलेश खटके, प्रशांत पडघन, प्रा. एन. पी. सिनकर, प्रा. डॉ. बबीता येवले, सारंग ढोमसे आदी उपस्थित होते.
श्री. शिंदे यांनी, मतदान प्रक्रियेत तरूणांचे महत्व अधिक आहे. देशात तरूणांना मिळालेल्या मतदानाच्या अधिकारामुळे त्यांची निर्णायक भूमिका आहे. आपल्याला मिळालेली लोकशाही ही आपले भाग्य आहे. अनेक देशात विविध शासन व्यवस्था आहे. आपण लोकशाही व्यवस्थेत राहतो, त्यांची फळे आपण पाहतो आहे. त्यामुळे मिळालेली लोकशाही टिकवावी लागणार आहे. संविधानाने मिळालेली लोकशाहीने देशाच्या विकासासत फार मोठे योगदान दिले आहे. संविधानाने दिलेली लोकशाही टिकविण्याची जबाबदारी तरूणांवर आहे. आता घरबसल्या मतदार नोंदणी करण्याची सोय आहे. त्यामुळे तरूणांनी नोंदणी करून मतदान करण्यासाठी पुढे यावे. ग्रामीण आणि अल्पशिक्षीत भागात मतदान अधिक प्रमाणात होते, मात्र शहरी किंवा उच्चशिक्षीत भागात कमी होत असलेले मतदान चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. भटकर यांनी प्रास्ताविकातून मतदारयादीत नोंदणीबरोबरच मृत्यू किंवा त्याठिकाणी राहत नसलेल्या नागरिकांचे नावे वगळणेही आवश्यक आहे. नवमतदारांनी मतदार नोंदणी करावी, तसेच मतदान आवश्य करावे असे आवाहन केले.
श्री. सिनकर यांनी मतदान अभियानात तरूणांनी सहभागी व्हावे. तसेच मतदान करून मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन केले.
श्रीमती येवले यांनी आपल्याला मतदानाचा हक्क सहज मिळाला आहे. हा हक्क अबाधित राहावा यासाठी ती टिकवून ठेवणे आपली जबाबदारी आहे. लोकशाहीचे भवितव्य तरूणांवर अवलंबून असल्याचे सांगितले.
यावेळी मतदान प्रक्रियेत उत्कृष्ट कार्य करणारे रघूनाथ वारे, स्मिता साठे, अजय बनारसे, प्रा. विश्वास जाधव, विजय वानखेडे, सैयद नासिर, प्रसन्न पंत, मिनाक्षी बाहेकर, जयप्रकाश त्रिपाठी, धमेंद्र कथलकर, समीर वडनेरकर, दिपक यादव, कल्पना भुयार, सुनिता कापसे, रेखा ब्राम्हणकर, शेख मुजीमुद्दीन, राजेश गावंडे, हेमलता पाटणकर, नितीन अविनाशे, जयंत सराटकर, संजय मडके, प्रमोद विजयकर, राजेश तुपोने, जिल्हा निवडणूक कार्यालयाचे प्रविण देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा व्हीडीओ संदेश दाखविण्यात आला. उपस्थितांना मतदानाबाबतची शपथ देण्यात आली. नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र वाटप करण्यात आले.