आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदी अनंत टेम्भूरकर यांची निवड

0
129

गोंदिया ता. 27:- डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2025 च्या अध्यक्षपदी अनंत टेम्भूरकर यांची निवड झाली आहे.जयंती समितीच्या सभेत सर्वांनूमते ही निवड करण्यात आली आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष एन. के. शेंडे हे होते. मंचावर निवर्तमान अध्यक्ष गेंदलाल तिरपुडे, सुशील गणवीर, विलास वासनिक,नरेंद्र मेश्राम,सुनील भरणे,श्रीमती मनिषा गजभिये, मच्छिन्द्र भेलावे उपस्थित होते.
अध्यक्ष पदासाठी अशोक कांबळे, अरविंद भावे, आणि अनंत टेम्भूरकर यांची नावे सूचित करण्यात आलीत.दरम्यान श्री भावे आणि श्री कांबळे यांनी आपले समर्थन श्री टेम्भूरकर यांना दिले.दरम्यान विलास वासनिक, किशोर रामटेके यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्यासंख्यने कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन करून आभार सुनील मेश्राम यांनी मानले.