भाजप सदस्या माहेश्वरी नेवारेंची सदस्यत्व रद्द झाल्याने काँग्रेसच्या कविता उईके होणार निर्विरोध जि.प.अध्यक्ष

0
566

फक्त जिल्हापरिषद उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक.

भंडारा,दि.२७ःभंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता आज २७ जानेवारीला निवडणूक होऊ घातली असून जिल्ह्यातील भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या श्रीमती माहेश्वरी नेवारे यांचे जिल्हा परिषदेचे सदस्यत्व पद रद्द झाल्याने काँग्रेसच्या कविता उईके यांची निर्विरोध निवड जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र यावेळी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असल्याने उपाध्यक्ष पदाकरीता महायुतीकडून अर्ज कुठल्या पक्षाचा जातो याकडे लक्ष लागले आहे.शक्यतोवर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षपदाचा अर्ज करणार असल्याचे बोलले जात आहे.

माहेश्वरी नेवारे यांचे जात वैधता प्रमाणपत्र विभागीय आयुक्तांनी रद्द केले होते.आदेशाविरोधात नेवारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. यावर आता भंडारा जिल्हा अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांचा निर्णय कायम ठेवला आहे. माहेश्वरी नेवारे यांचे जिल्हा परिषद सदस्य पद रद्द करण्यात आल्याचे पत्र पाठवित जिल्हाधिकारी यांनी आजच्या निवडणूक बैठकिला आपण हजर राहू नये असे पत्र सुध्दा दिले आहे.
भंडारा जिल्ह्यात भाजपासाठी हा धक्का मानला जात आहे. भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. भाजपाकडून माहेश्वरी नेवारे या प्रबळ दावेदार होत्या. पण, आता त्यांचे सदस्यत्वपद रद्द झाल्यामुळे त्यांना निवडणुकीत सहभागी होता येणार नाही. यामुळे आता काँग्रेसचा अध्यक्षपदाचा मार्ग सुकर झालेला आहे.

भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक होणार आहे. याआधीच भाजपाला मोठा धक्का बसला आहे. माहेश्वरे नेवारे यांचे सदस्यत्वपद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरवले आहे. याआधी विभागीय आयुक्त यांनी सदस्यस्वपद रद्द ठरवले होते.

माहेश्वरी नेवारे या साकोली तालुक्यातील किन्ही एकोडी जिल्हा परिषद गावातून त्या अनुसूचित जमातीच्या आऱक्षित जागेवरुन निवडून आल्या आहेत. नेवारे या गोंडगोवारी या जात प्रमाणपत्रावर निवडून आल्या आहेत. माहेश्वरी नेवारे यांचे जात वैधता प्रमाणपत्र १४ जानेवारी रोजी गोंदिया जात पडताळणी समितीने रद्द केले आहे.जात वैधता पडताळणी समितीच्या विरोधात नेवारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यात नेवारे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करून त्यांचा सदस्यत्व ही रद्द केले होते.