कचारगड यात्रेदरम्यान पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जारी

0
388

गोंदिया, दि.27 : सालेकसा तालुक्यातील कचारगड (धनेगाव) येथे येत्या 10 ते 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत महाकाली कंकाली कोपरलिंगा यात्रा होणार आहे. सदर यात्रेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होतात. त्या ठिकाणी भाविकांची व त्यांच्या वाहनांची वाहतुक होत असते. त्यामुळे जड-अवजड वाहनापासून यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवून गंभीर स्वरुपाचे अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी प्रजित नायर यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये त्यांनी आमगाव कडून डोंगरगड कडे जाणारे व येणारे जड अवजड वाहने (एस.टी.बस व अग्नीशमन वगळून) 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजेपासून ते 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत आमगाव-सालेकसा-डोंगरगड कडे जाणारी जड-अवजड वाहतूक पुर्णत: बंद करुन आमगाव-देवरी-डोंगरगड या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. तसेच डोंगरगड-सालेकसा-आमगाव कडे येणारी जड-अवजड वाहतूक पुर्णत: बंद करुन डोंगरगड-देवरी-आमगाव या पर्यायी मार्गे वळविण्यात येत आहे असे एका अधिसूचनेद्वारे आदेश जारी केले आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.