गोंदिया दि. २९ :महिला व बाल विकास मंत्रालयाच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमांस १० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल आरोग्य विभाग व महिला व बाल विकास विभाग यांच्या एकत्रित सहकार्याने जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग प्रशासनाच्यावतीने स्वाक्षरी मोहिम व जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,वैद्यकिय अधिकारी वेदप्रकाश चौरागडे,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकरी विजय आखाडे,जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात यांचे समवेत आरोग्य व महिला व बाल विकास विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महिला व बाल विकास विकास मंत्रालयाच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमामुळे लिंगभेद चाचणीस प्रतिबंध, मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपुर्ण योगदान प्राप्त झाले आहे.या उपक्रमास दि.22 जानेवारी 2025 रोजी दहा वर्षे पुर्ण होत असल्याने संपुर्ण राज्यात दि.8 मार्च 2025 पर्यंत विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणुन दि.24 रोजी आरोग्य विभागाच्या वतीने बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रमाची जनजागृती व स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
यावेळी अधिकारी, कर्मचारी यांनी स्वाक्षरी बोर्डवर स्वाक्षरी करून नंतर बेटी बचाओ, बेटी पढाओची शपथ देण्यात आली.सदर”बेटी बचावो-बेटी पढावो”या अभियान कार्यक्रमप्रसंगी आरोग्य विभागातील प्रमोद काळे,शाम लिचडे,प्रकाश रहांगडाले,टेकचंद चौधरी,प्रमोद मेश्राम,प्रशांत बोरकर,विजय शेंडे,रविंद्र श्रीवास,मिलींद नंदागवळी,देवचंद चव्हाण,प्रशांत बंसोड,मनिषा देशमुख,मंजु रहांगडाले,मनोज चव्हाण,विद्या वालकोळी, कल्याणी चौधरी,निलु चुटे यांनी सहभाग घेऊन नाविन्यपुर्व उपक्रम साजरा केला