नियुक्ती देण्यासाठी आरोग्य सेविकांचे उपोषण

0
17

गोंदिया : राज्य शासनाच्या आदेशाने गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत विविध ठिकाणच्या आरोग्य केंद्रात रिक्त असलेली आरोग्य सेविकांची ३७ पदे भरण्यासाठी २५ नोव्हेंबर २0१५ ला परीक्षा घेण्यात आली. मात्र नऊ महिने लोटले तरी ही या भरतीची पुढील प्रक्रिया केली जात नसल्यामुळे परीक्षा देणार्‍या १0१३ उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यापैकी १0 उमेदवार महिला सोमवारपासून जि.प. समोर बेमुदत उपोषणावर बसल्या आहेत.
आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवेत गणल्या जात असल्याने या विभागाची सेवा जास्तीत जास्त चांगली राहावे यासाठी रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे.
सदर आरोग्य सेविकांच्या पदभरतीला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचार्‍यांच्या संघटनेने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात आव्हाण दिले होते. त्यानंतर न्यायालयाने राज्यभरात या पदभरतीला स्थगीती दिली होती. मात्र रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा प्रभावित होऊ नये म्हणून काही जिल्ह्यांनी ही पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित निकालाच्या अधीन राहून उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. उमेदवारांनीही न्यायालयाचा निकाल मान्य राहील असे प्रतिज्ञापत्र लिहून दिले. िभंडारा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या सर्वच जिल्ह्यात ही भरती प्रक्रिया पूर्ण करून आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र गोंदियातच ही प्रक्रिया केली नाही. त्यामुळे्न नियुक्तीच्या आशेने नजर लावून बसलेल्या हजारावर बेरोजगार युवती करीत आहेत.
सरळ सेवा भरतीअंतर्गत २५ नोव्हेंबर २0१५ रोजी झालेल्या या परीक्षेचा निकाल ३0 नोव्हेंबरलाच लावला होता. मात्र प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी न लावता सरसकट सर्वांचे गुण असणारी यादी लावण्यात आली. त्यामुळे नेमका कुणाचा नंबर लागू शकतो याचाही अंदाज घेणे शक्य होत नसल्यामुळे उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या चकरा मारीत थकलेल्या उमेदवारांनी आज सोमवारपासून जि.प. समोर उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणावर सपना मेश्राम, पुष्पा कटरे, मनिमाला विश्‍वास, अनिता सोनवाने, प्रतिमा रामटेके, लता कापसे, दीपमाला उंदीरवाडे, भूमाली उईके, अर्चना बोरकर, जयश्री केंद्रे, वर्षा गेडाम, गंगा चव्हाण, सुंदरा भगत, उषा मेंढे ह्या उमेदवार बसल्या आहेत.