मॅरेथॉन स्पर्धेतुन नवयुवकांनी केली “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती

0
24

गोंदिया,दि. 30 –केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि.26 जानेवारी ते 30 जानेवारी 2025 या कालावधीत जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुष्ठरोग शोध मोहीम अभियान दि.31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2025 दरम्यान राबविण्यात येत आहे.या दोन्ही मोहीमेत जनजागृती व सर्वेक्षणावर विशेष भर देण्यात येत आहे.अभियाना दरम्यान नागरिकांनी कुष्ठरुग्ण आजाराबाबत गैरसमज व भिती न ठेवता आपल्याला होणारा त्रास न लपवता घरी येणार्या पथकाला सहकार्य करावे. कुष्ठरुग्णांसोबत समाजात भेदभाव न होता सन्मानाने जगण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करावे.
जिल्ह्यात दि.30 जानेवारी रोजी जागतिक कुष्ठरोग जनजागृती अभियाना अंतर्गत जिल्हास्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.पुरुष 5 कि.मी. व महिला 3 कि.मी. ह्या वर्गात खुली मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.सर्वात प्रथम सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन व माल्यार्पन करण्यात आले. मॅरेथॉन रन सकाळी आठ वाजता जयस्तंभ चौक येथून सुरुवात होऊन आमगाव रोड वरून सारस चौक जिल्हा परिषद येथे समापन होऊन परत मुळ ठिकाणी रन वे पार पड्ली. गोंदियातील मोठ्या संख्येने नवयुवा वर्ग,आरोग्य विभाग व के.टी.एस. सामान्य रुग्णालयातील अधिकारि व कर्मचारी यांनी कुष्ठरोगाला हरविण्यासाठी स्पर्धेत भाग घेतला. जिल्हा आरोग्य प्रशासना मार्फत मॅरेथॉन रन साठी प्रथम पारितोषिक रु. 4000/-, द्वितीय पारितोषिक रु.2500/- तर तृतीय पारितोषिक रु.1500/- व प्रमाणपत्र देण्यात येणार होते.मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिष मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,सहायक संचालक (कुष्ठरोग)डॉ.महेंद्र धनविजय यांनी हिरवी झेंडी देवुन सुरुवात केली.ह्यावेळेस जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरजंन अग्रवाल,गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव,अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल,वैद्यकीय अधिकारी डॉ.भाग्यश्री गावंडे,डॉ.वेदप्रकाश चौरागडे,डॉ.देव चांदेवार,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे,डॉ.अनिल आटे,डॉ.कांचन भोयर हे सुद्धा उपस्थित होते.150 नवयुवक,50 अधिकारी व कर्मचारी असे मिळुन 200 जणांनी मॅरेथॉन रन वे मध्ये भाग घेतला.
जिल्हास्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुरुष गटात निखार भेलावे, रितीक म्हसकरे, अमोल चव्हाण तर महिला गटात आरती भगत,हर्षा मडावी,प्रिया चानप यांनी प्रथम-व्दितीय व तृतीय पुरस्कार पटकावले.मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना व स्पर्धेत भाग घेणार्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कुष्ठरोगावरील म्हणी/घोषवाक्य/ पोष्टरच्या माध्यमातुन मोठी जनजागृती ह्या वेळी करण्यात आली.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान जिल्हास्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धेमध्ये  मोठ्या संख्येने नवयुवक व अधिकारी/कर्मचारी यांनी भाग घेवुन कुष्ठरोग आजाराबाबत जनजागृती करत असल्याबद्दल जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत गोंदियावासियांचे,पोलीस प्रशासनाचे,प्रेस व मिडिया विभागाचे अभिनंदन केले आहे.सूत्रसंचालन प्रज्ञा कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन संतोष बोरकर यांनी केले.
जिल्हास्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी साठी जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात, अवैद्यकीय सहाय्यक विवेक पडोळे,डार्विन पडोळे,भूपेंद्र बोकासे,निमवैद्यकीय कर्मचारी संतोष बोरकर,अंबादास उईके,अनिल पडोळे,स्वाती पाटील,रेखा कानतोडे,जगदीश पंचभाई, अशोक मुडपिलवार,अभिनय तराडे व धम्मदीप मेश्राम,पावर फिटनेस ॲकॅडमीतले कोच दिनेश बनसोडे व टीम तसेच कुष्ठरोग,क्षयरोग,केटीएस,आयुश विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.