हिंगणघाट आगारात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान

0
27

हिंगणघाट,दि.३१ः राज्य परिवहन महामंडाळाच्या हिंगणघाट आगारत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान जानेवारी 2025 चा समारोप कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला हिंगणघाटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक घनश्याम पाटील,शक्ती ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक सुरेन्द्र आग्रे प्रामुख्याने उपस्थित होते.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगणघाट आगाराचे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे  होते.यावेळी सुरक्षित वाहन चालविण्यासाठी, वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्यासाठी, त्याचे अपघातामुळे होणारे परिणाम, इंधन बचतीचे महत्व, ई. बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत सडमाके सहाय्यक वाहतूक अधीक्षक, संचालन सय्यद आसिफ वाहतूक नियंत्रक आणि आभार प्रदर्शन मनोहर वाने वाहतूक निरीक्षक यांनी केले.